मोबाईल निर्माता कंपनी स्वाइपने लहान मुलांसाठी एक खास स्मार्टफोन लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनचे नाव स्वाइप ज्युनियर असे आहे. कंपनीने सांगितले आहे की, हा स्मार्टफोन पॅरेंटल कंट्रोल फीचरने सुसज्ज आहे आणि 5-15 वयोगटातील मुलांसाठी हा खास बनविला आहे. हा स्मार्टफोन SOS फीचरने सुसज्ज आहे, ज्याला वापरल्यावर डिवाइस स्वत:च आपोआप एका निर्धारित नंबरवर कॉल करेल. हा हँडसेट शॉक प्रूफ केसमध्ये येतो.
कंपनीने स्वाइप ज्युनियर स्मार्टफोन लाँच करणार असल्याची घोषणा ट्विटरवर केली. हा अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे. ह्या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्मार्टफोनवर पालक नियंत्रण ठेवू शकतात, ह्याला जियो ट्रॅकिंग आणि जियो फेसिंग फीचरसुद्धा म्हटले जाते. त्याचबरोबर फोनमध्ये पाल्य मुलांसाठी एक सुरक्षित आणि धोकादायक असे झोन निर्धारित करु शकतात. ज्युनियर स्मार्टफोनच्या माध्यमातून त्यांचे कुटूंब मुलांचे अॅप वापरावरही नियंत्रण ठेवू शकतात. अॅप मॅनेजमेंट सिस्टमच्या मदतीने त्यांचे पाल्य त्यांच्या कोणत्याही अॅपला ब्लॉक करु शकतात.
ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ४.५ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz ड्युल-कोर प्रोसेसर आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 4GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ५,९९९ रुपये आहे.
त्याचबरोबर ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 4.4 किटकॅटवर काम करतो. ह्यात 1900mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, GPS, वायफाय आणि मायक्रो-USB फीचरसुद्धा दिले आहे.