हा फोन 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी स्वाइपने बाजारात आपला नवीन फोन एलीट प्लस सादर केला आहे. कंपनीने आपल्या ह्या फोनला कमी किंमतीत म्हणजेच केवळ ६,९९९ रुपयात लाँच केले आहे. हा फोन आयव्हरी व्हाइट आणि मिडनाइट ब्लू रंगात उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये किंमतीच्या तुलनेत खूप आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ह्यात 5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 480ppi आहे. हा फोन 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 2GB ची रॅम दिली गेली आहे. फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या डिवाइससह 100GB चे क्लाउड स्टोरेजसुद्धा दिले जात आहे. हा अॅनड्रॉईड आधारित फ्रिडॉम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे. ह्यात 3050mAh ची बॅटरी दिली जात आहे.
ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो 4G LTE, वायफाय, GPS ब्लूटुथ आणि मायक्रो-USB 2.0 ने सुसज्ज आहे.