Realme पुढील महिन्यात ब्रँड आपली Realme 11 Pro 5G सिरीज लाँच करणार आहे. त्याआधी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी स्मार्टफोन कंपनी Realme सोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीने गुरुवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, शाहरुख खान कंपनीचा नवीन ब्रँड अँबेसेडर बनला आहे. शाहरुख Realme च्या 'डेअर टू लीप' या ब्रीदवाक्याचा एक भाग बनला आहे. आगामी लाँचपूर्वी ही जबाबदारी शाहरुख खानवर सोपवण्यात आली आहे.
https://twitter.com/realmeIndia/status/1661630143939465216?ref_src=twsrc%5Etfw
Realmeने ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "रील ते रियल पर्यंत, शाहरुख खान आमचा डेअर टू लीप पायनियर म्हणून पुढची झेप घेण्यास सज्ज आहे. फोटोखाली ''हॅलो न्यू ब्रँड अँबेसेडर" असे लिहिलेले दिसत आहे. पुढे ''नवीन Realme 11 Pro 5G सिरीजसाठी जूनमध्ये भेटू'', असे बारीक अक्षरात लिहलेले दिसतेय.
https://twitter.com/realmeIndia/status/1661231002461536257?ref_src=twsrc%5Etfw
कंपनीच्या वेबसाइटनुसार विशेषतः या नवीन सीरिजमध्ये जो कॅमेरा असेल, तो जास्तीत जास्त पिक्सेल 200MP पॉवरसह येईल. यात अपग्रेड केलेला ISOCELL HP3 SuperZoom 200MP सेन्सर कॅमेरा असेल. यासह जबरदस्त कॅमेरासह तुम्हाला फोटोग्राफीचा भारी अनुभव मिळणार आहे. 24 मे रोजी कंपनीने नवीन सीरीज फोनच्या स्मार्टफोनचा टीझर देखील जारी केला.