मोबाईल निर्माता कंपनी स्पाइसने आपल्या आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँड नेक्सियनच्या अंतर्गत भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन नेक्सियन NV-45 सादर केला आहे. भारतीय बाजारात ह्याची किंमत ३,७९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन विशेष करुन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
स्पाइस नेक्सियन NV-45 स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ह्यात ड्रॅगनटेल ग्लासची स्क्रीन आहे, जी परंपरागत सोडा लाइम ग्लासपेक्षा खूपच मजबूत असते.
ह्या स्मार्टफोनच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz स्प्रे़डट्रूम SPRD7731 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ३.२ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा एक ड्यूल सिम फोन आहे जो WCDMA आणि GSM दोघांवर काम करेल. हा अॅनड्रॉईड 4.4.2 किटकॅटवर काम करेल. ह्यात 1650mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफायसारखे अनेक फीचर्स आहेत. त्याशिवाय ह्यात ब्लूटुथ 4.0, मायक्रो-USB, GPRS/EDGE, GPS/A-GPS आणि 3G सारखे फीचर्स आहेत.