एंड्राइड गो एडिशन सह लॉन्च झाला नवीन Spice F311 स्मार्टफोन, किंमत फक्त 5,599 रूपये

Updated on 28-Jun-2018
HIGHLIGHTS

Spice F311 ला कंपनी ने गूगल च्या एंड्राइड गो एडिशन मोहिमे अंतर्गत लॉन्च केले आहे याची किंमत 5,599 रूपये ठेवण्यात आली आहे.

Spice F311 smartphone launched with android go edition at 5,999 rupees: Spice Devices ने भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन F311 नावाने लॉन्च करण्यात आला आहे, हा स्मार्टफोन गूगल च्या एंड्राइड गो मोहिमे अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंड्राइड ओरियो (गो एडिशन) वर चालतो. Spice F311 5,599 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे आणि डिवाइस चे चार कलर वेरिएंट आहेत ज्यात रोज गोल्ड, ब्लॅक, आणि फेंटम रेड कलर आहेत. एंड्राइड गो अंतर्गत गूगल पुढील बिलियन यूजर्सना टारगेट करत आहे. याचा अर्थ असा की हा गूगल गो अॅप्स सपोर्ट सह एंट्री लेवल स्मार्टफोन्स साठी यांना तयार करत आहे. 

स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर Spice F311 मध्ये 5.4 इंचाचा FWVGA+ IPS फुल लॅमिनेशन डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 480×960 पिक्सल आहे तसेच एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. त्याचबरोबर डिस्प्ले ची कलर डेंसिटी पाहता ती 196ppi आहे. डिवाइस मध्ये मीडियाटेक 64 बिट क्वॉड कोर चिपसेट सह माली T720 MP1 GPU आहे. 

डिवाइस मध्ये 1GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड ने 32GB पर्यंत वाढवता येते. डिवाइस मध्ये 2,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे ज्या बद्दल कंपनी म्हणते की ही 240 तासांचा स्टँडबाय टाइम ऑफर करते. 

ऑप्टिक्स पाहता F311 चा रियर कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे जो f/2.0 अपर्चर आणि LED फ्लॅश सह येतो तर डिवाइस च्या फ्रंटला 5 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा पण LED फ्लॅश सह उपलब्ध आहे. सिक्योरिटी साठी डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी हा स्मार्टफोन डुअल सिम कार्ड स्लॉट्स, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2, GPS आणि USB OTG ला सपोर्ट करतो.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :