Spectra ने Rs 999 मध्ये खास ऑफर सह लॉन्च केला नवीन बेसिक ब्रॉडबँड प्लान

Spectra ने Rs 999 मध्ये खास ऑफर सह लॉन्च केला नवीन बेसिक ब्रॉडबँड प्लान
HIGHLIGHTS

Spectra ब्रॉडबँड ने आपल्या बेसिक ब्रॉडबँड प्लान मध्ये 100 Mbps स्पीड आणि डेटा कॅरी फॉरवर्ड फीचरचा समावेश केला आहे.

इन्टरनेट सर्विस प्रोवाइडर Spectra ने आपला बेसिक ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत Rs 999 ठेवण्यात आली आहे. स्पेक्ट्रा दिल्ली, बँगलोर, मुंबई आणि चेन्नई अशा शहरांत वायर्ड ब्रॉडबँड कनेक्शंस देते. दिल्ली आणि बँगलोर मध्ये कंपनी 1 Gbps चे ब्रॉडबँड प्लान सादर करत आहे, पण हा निवडक ठिकाणी उपलब्ध आहे. स्पेक्ट्रा चे दोन वेगवेगळे ब्रॉडबँड प्लान्स चे सेट उपलब्ध आहेत, ज्यात एक 100 Mbps स्पीड सह येतो तसेच दुसरा 1 Gbps स्पीड सह येतो. हे नवीन स्पेक्ट्रा बेसिक ब्रॉडबँड प्लान्स अशा ठिकाणी सादर करण्यात आले आहेत जिथे कंपनी 100 Mbps स्पीड ऑफर करते.

Spectra प्लान चे लाभ आणि FUP लिमिट
Spectra च्या बेसिक ब्रॉडबँड प्लान मध्ये 100 Mbps चा डाउनलोड आणि उपलोड स्पीड मिळतो. कंपनी ने यात प्रतिमाह 200GB पर्यंतची FUP दीली आहे जी कॅरी फॉरवर्ड फीचर सह येते. कॅरी फॉरवर्ड फीचर च्या माध्यमातून यूजर्स चालू महिन्यातील न वापरलेला डेटा पुढल्या महिन्यातील प्लान मध्ये अॅड करू शकतात. सर्वात आधी एयरटेल ने डेटा कॅरी फॉरवर्ड फीचर सादर केला होता, त्यानंतर स्पेक्ट्रा आणि YOU ब्रॉडबँड ने त्याचे अनुकरण केले. पण स्पेक्ट्राने अकाउंट मध्ये किती डेटा साठवता येईल याचा खुलासा केला नाही. 

प्लान मध्ये 200GB ची FUP लिमिट संपल्यावर यूजर 1 Mbps च्या डाउनलोड आणि उपलोड स्पीडचा लाभ घेऊ शकतात. Spectra Basic ब्रॉडबँड प्लान ची मासिक किंमत Rs 999 आहे पण टॅक्स नंतर ही किंमत Rs 1,359 होते. 

स्पेक्ट्रा देत आहे डबल डेटा 
Spectra ने प्लान सोबत अजून एक ऑफर पण सादर केली आहे. जर युजर सहा महिन्यांसाठी एक ब्रॉडबँड प्लान घेत असले तर कंपनी त्याच्या सब्सक्रिप्शन पीरियड मध्ये प्रति माह 400GB डेटा देईल. जर यूजर फक्त एक महिन्यासाठी ब्रॉडबँड प्लान घेत असेल तर प्रतिमाह 200GB डेटा देण्यात येईल. जर यूजरने सहा महिन्यांसाठी प्लान घेतला तर स्पेक्ट्रा डेटा कॅरी फॉरवर्ड फीचर पण देते. इनस्टॉलेशन साठी प्रत्येक यूजरला Rs 1,000 द्यावे लागतील. 

तसेच, Spectra डेटा टॉप-अप स्कीम सह येते, ज्याच्या माध्यमातून यूजर्स हाई-स्पीड 100 Mbps डेटा वापरण्यासाठी आपल्या अकाउंटला टॉप-अप करू शकतात. उदाहरणार्थ, जर एका यूजर ने आपला स्पेक्ट्रा बेसिक ब्रॉडबँड प्लानचा 200GB डेटा संपवला आणि त्याला अजून हाई-स्पीड डेटा हवा असल्यास डेटा टॉप-अप करता येईल. यासाठी यूजर Rs 300 मध्ये 100GB चा डेटा टॉप-अप घेऊ शकतो आणि कंपनी हा डेटा पुढल्या महिन्याच्या प्लान मध्ये कॅरी करण्याची सुविधा पण देते. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo