स्पेक्स कम्पॅरिझन: शाओमी रेडमी नोट 6 प्रो विरुद्ध रियलमी 2
Xiaomi आपला Xiaomi Redmi Note 6 Pro मोबाईल फोन 22 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करणार आहे. याचा अर्थ असा आहे कि भारतात हा स्मार्टफोन आज लॉन्च केला जाणार आहे. पण याच्या लॉन्चच्या आधी आज आम्ही या मोबाईल फोनची एका अन्य बजेट/मिड-रेंज स्मार्टफोन Realme 2 शी तुलना करणार आहोत.
Xiaomi Redmi Note 6 Pro मोबाईल फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो, म्हणजेच हा स्मार्टफोन आजच भारतात लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोन मध्ये चार कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे. अर्थात् हा मोबाईल फोन ड्यूल रियर आणि ड्यूल फ्रंट कॅमेरा स येणार आहे. तसेच यात तुम्हाला एक नॉच डिस्प्ले पण मिळत आहे. तसेच तुम्हाला सांगतो कि Realme 2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ड्यूल रियर कॅमेरा फक्त याच्या बॅक पॅनल वर मिळत आहे. या मोबाईल फोनची किंमत Rs 10,000 च्या आत आहे. चला एक नजर टाकूया या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्स वर आणि बघूया कि या दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये काय मोठा फरक आहे.
जर आपण या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स पासून सुरवात केली तर Xiaomi Redmi Note 6 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.26-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे, त्याचप्रमाणे जर Realme 2 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 6.2-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. इथे तुम्ही बघू शकता कि या दोन्ही फोन्सच्या डिस्प्ले साइ मध्ये जास्त फरक नाही. पण Xiaomi Redmi Note 6 Pro रेजोल्यूशन च्या बाबतीती जास्त चांगला आहे असे आपण म्हणू शकतो.
प्रोसेसर बद्दल बोलायचे तर तुम्हाला सांगू इच्छितो कि Xiaomi Redmi Not 6 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. हा Realme 2 मोबाईल फोन मधील क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसर पेक्षा कितीतरी चांगला आहे.