Samsung ने जानेवारी 2019 च्या शेवटी आपल्या गॅलेक्सी M सीरीजचे दोन स्मार्टफोन्स Galaxy M10 आणि M20 लॉन्च केले होते आणि हे दोन्ही फोन्स अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध करण्यात आले आहेत. दुसरीकडे Nokia 6.1 Plus बद्दल बोलायचे झाले तर या फोनने 15,000 रुपयांच्या श्रेणीत आपली जागा बनवली आहे आणि डिवाइसच्या वरच्या बाजूला एक मोठी नॉच पण आहे. आज आम्ही Samsung Galaxy M20 आणि Nokia 6.1 Plus स्मार्टफोन्स मध्ये स्पेसिफिकेशंसची तुलना करत आहोत जेणेकरून कोणता स्मार्टफोन चांगले स्पेक्स ऑफर करत आहे ते समजेल.
डिस्प्ले पासून सुरवात करायची झाल्यास Samsung Galaxy M20 मध्ये 6.3 इंचाचा FHD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1080 x 2340 पिक्सलच्या रेजोल्यूशन सह येतो आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूला एक V ड्रॉप नॉच पण आहे. दुसरीकडे Nokia 6.1 Plus ला एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 5.8 इंचाचा FHD+ (2280×1080) डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि हा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. डिवाइसेजच्या फ्रंट आणि बॅक वर गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे.
प्रोसेसर बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy M20 सॅमसंग एक्सिनोस 7904 ओक्टा-कोर प्रोसेसर द्वारा संचालित आहे आणि Nokia 6.1 Plus क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 ओक्टा-कोर प्रोसेसर ने सुसज्ज आहे. हे दोन्ही प्रोसेसर 14nm प्रोसेस वर बनवण्यात आले आहेत आणि परफॉरमेंसच्या बाबतीती SD 636 थोडा चांगला असू शकतो.
कॅमेरा डिपार्टमेंट मध्ये Samsung Galaxy M20 मध्ये 13MP + 5MP चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा आहे. बॅक पॅनल वर देण्यात आलेला 5MP चा कॅमेरा वाइड-एंगल शॉट्स घेण्याच्या कामी येतो. Nokia 6.1 Plus च्या मागील बाजूस 16 आणि 5 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच डिवाइसच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि याचा अपर्चर f/2.0 आहे.
बॅटरी डिपार्टमेंट पाहता Galaxy M20 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि USB टाइप-C सह येते. दुसरीकडे Nokia 6.1 Plus मध्ये 3,060mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी USB टाइप-C च्या माध्यमातून फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy M20 चा 4GB रॅम वैरिएंट अमेझॉन द्वारा 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि Nokia 6.1 Plus अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही ऑनलाइन स्टोर्स वर उपलब्ध आहे.