Nokia 8.1 विरुद्ध Oppo R17 Pro कोणता आहे चांगला?
आज आम्ही दोन मिड-रेंज फ्लॅगशिप मोबाईल फोन्सची एकमेकांशी तुलना करणार आहोत. आज आम्ही नुकतेच भारतीय बाजारात लॉन्च केल्या गेलेल्या Nokia 8.1 सोबत Oppo R17 Pro ची तुलना करणार आहोत, आणि स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सच्या बाबतीती कोणता डिवाइस जास्त चांगला आहे हे बघणार आहोत.
Nokia 8.1 मोबाईल फोन दुबई मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये 5 डिसेंबरला लॉन्च केल्यानंतर हा भारतात 10 डिसेंबरला लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईल फोनची सर्वात मोठी खासियत याचा HDR10 सपोर्ट आणि याचा ड्यूल रियर कॅमेरा आहे. Oppo R17 Pro मोबाईल फोन पाहिला तर हा एक मिड-रेंज फ्लॅगशिप मोबाईल फोन आहे, आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया की या दोन्ही स्मार्टफोन्स म्हणजे नोकिया 8.1 आणि Oppo R17 Pro मध्ये स्पेक्स आणि फीचर्सच्या आधारावर काय फरक आहे.
डिस्प्ले
डिस्प्ले पासून चर्चेला सुरवात करूया, हा मोबाईल फोन एका 6.18-इंचाच्या एज-टू-एज डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला एक नॉच पण मिळत आहे, ज्यात तुम्हाला फोनचा फ्रंट कॅमेरा दिसेल.
तसेच Oppo R17 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, हि एक 2340×1080 पिक्सल रेजोल्यूशनची स्क्रीन आहे. हा मोबाईल फोन वाटर ड्राप नॉच सह येतो.
कॅमेरा
कॅमेरा पाहता, Nokia 8.1 मोबाईल फोन एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला एक 12MP+13MP चा AI आधारित रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांना OIS चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फ्रंट वर एक 20MP चा कॅमेरा पण तुम्हाला मिळणार आहे.
Oppo R17 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे, जी या फोनची सर्वात मोठी हाईलाइट आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 12MP चा प्राइमरी + एक 20MP चा सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे, तसेच याचा तिसरा सेंसर TOF सेंसर आहे. त्याचबरोबर फोनच्या फ्रंटला तुम्हाला एक 25MP चा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळत आहे, जो पोर्ट्रेट फोटो घेऊ शकतो आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज
Nokia 8.1 मोबाईल फोन विषयी बोलायचे तर हा जगातील काही फोन्स पैकी एक आहे. जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ओक्टा-कोर प्रोसेसर सह येतो. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 4GB चा रॅम मिळत आहे, त्याचबरोबर तुम्हाला यात 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे. हि स्टोरेज तुम्ही 400GB पर्यंत माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता.
Oppo R17 Pro मोबाईल फोन पाहता हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 8GB रॅम सह 128GB की इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे. पण एक गोष्ट लक्षात असू दे की तुम्ही याची स्टोरेज वाढवू शकत नाही.
बॅटरी
बॅटरी बद्दल बोलायचे तर Nokia 8.1 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 3500mAh क्षमता असेलेली 18W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली बॅटरी मिळत आहे. कंपनी नुसार हि बॅटरी जवळपास 2 दिवस चालू शकते.
आता Oppo R17 Pro मोबाईल फोन बद्दल बोलूया, यात तुम्हाला एक 3700mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी कंपनी अनुसार एक दिवस चालू शकते. हि कंपनीच्या सुपर VOOC फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करते. हा फोन जवळपास 15 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.
किंमत
Nokia 8.1 आणि Oppo R17 Pro मोबाईल फोन्स बद्दल बोलायचे तर Nokia 8.1 मोबाईल फोन भारतात Rs 26,999 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा तुम्ही 25 डिसेंबर पासून भारतात ऑफलाइन आणि ऑनलाइन बाजार दोन्ही वरून विकत घेऊ शकता. Oppo R17 Pro मोबाईल फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट Rs 45,999 मध्ये विकत घेता येईल.