Micromax Infinity N11 विरुद्ध Infinity N12 मधील स्पेक्सची तुलना

Micromax Infinity N11 विरुद्ध Infinity N12 मधील स्पेक्सची तुलना
HIGHLIGHTS

माइक्रोमॅक्स इनिफिनिटी N11 आणि माइक्रोमॅक्स इनफिनिटी N12 स्मार्टफोन्स नुकतेच भारतात क्रमश: Rs 8,999 आणि Rs 9,999 मध्ये लॉन्च केले गेले आहेत. चला तर मग आता दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्स वर बारीक नजर टाकूया आणि जाणून घेऊया की हे दोन्ही फोन्स एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत.

गेल्याच मंगळवारी Micromax ने त्यांचे दोन नवीन मोबाईल फोन्स भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स माइक्रोमॅक्सच्या इनफिनिटी सीरीज मध्ये लॉन्च केले गेले आहेत. मोबाईल फोन्स माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि इनफिनिटी N12 स्वरूपात लॉन्च केले गेले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये तुम्हाला नॉच डिस्प्ले आणि 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. चला तर मग बघूया या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेक्स आणि जाणून घेऊया की एकमेकांपेक्षा किती चांगले आहेत हे स्मार्टफोन्स.
 

विशेष म्हणजे Micromax Infinity N11 आणि Infinity N12 मोबाईल फोन्स मध्ये तुम्हाला जवळपास एकसारखेच स्पेक्स मिळत आहेत. पण जेव्हा विषय कॅमेरा आणि रॅम इत्यादीचा येतो तेव्हा तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये थोडा फरक दिसू लागतो. 

माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि N12 चा डिस्प्ले

डिस्प्ले बद्दल बोलायचे तर Infinity N11 आणि N12 मध्ये तुम्हाला एक 6.19-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे, तसेच हे दोन्ही डिस्प्ले 720×1500 पिक्सलचे आहेत. तसेच तुम्हाला या दोन्ही फोन्स मध्ये नॉच डिस्प्ले मिळत आहे. यात तुम्हाला स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा आणि स्पीकर मिळेल. 

माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि N12 ची परफॉरमेंस  

या दोन्ही स्मार्टफोन्स म्हणजे माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि N12 मध्ये तुम्हाला मीडियाटेक Helio P22 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे, हा 2GHz क्लॉक स्पीड सह येतो. तसेच N11 मध्ये तुम्हाला 2GB रॅम आणि 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, तर दुसऱ्या स्मार्टफोन म्हणजे इनिफिनिटी N12 मध्ये तुम्हाला 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळत आहे, हि स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. 

माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि N12 चा कॅमेरा 

कॅमेरा सेगमेंट बद्दल बोलायचे तर दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला एक ड्यूल 13MP + 5MP चा कॅमेरा सेटअप मिळत आहे, त्याचबरोबर तुम्हाला फ्रंटला N11 मध्ये एक 8MP चा कॅमेरा यूनिट मिळत आहे, तसेच तुम्हाला N12 मध्ये एक 16MP चा सेंसर मिळत आहे.  

माइक्रोमॅक्स इनफिनिटी N11 आणि N12 ची किंमत 

माइक्रोमॅक्सचे हे दोन्ही मोबाईल फोन्स एंड्राइड 8.1 Oreo वर लॉन्च केले गेले आहेत आणि विशेष बाब अशी की हे लवकरच एंड्राइड 9.0 वर अपग्रेड केले जाणार आहेत. Micromax Infinity N11 मोबाईल फोन Rs 8,999 मध्ये घेतला जाऊ शकतो, तर Micromax Infinity N12 तुम्ही Rs 9,999 मध्ये विकत घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo