Asus Zenfone Max Pro M2 की Realme 2 Pro कोणता डिवाइस आवडेल तुम्हाला?
Asus ने भारतीय बाजारात त्याचा एक नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आज आम्ही या मोबाईल फोन सोबत Realme 2 Pro मोबाईल फोनच्या स्पेक्सची तुलना करणार आहोत. चला जाणून घेऊया की हे दोन्ही बजेट मोबाईल फोन्स स्पेक्स आणि फीचर्स च्या बाबतीती एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत.
Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन भारतीय बाजारात वेगवेगळ्या तीन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा मोबाईल फोन 3GB/32GB, 4GB/64GB, 6GB/64GB स्टोरेज ऑप्शन्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवू शकता आहे. या मोबाईल फोनची किंमत Rs 12,999 पासून सुरु होत आहे. तसेच Realme 2 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल फोन पण भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट मिळत आहे, हा एक नवीन स्टॅंडर्ड झाला आहे. बजेट फोन्स मध्ये तुम्ही बऱ्याचदा हाच प्रोसेसर बघू शकता. चला एक नजर टाकूया या दोन्ही मोबाइल्सच्या स्पेक्स आणि फीचर्स वर आणि जाणून घेऊया की एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत हे स्मार्टफोन.
डिस्प्ले
Asus Zenfone Max Pro M2 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.3-इंचाचा FHD+ नॉच डिस्प्ले मिळत आहे. हि एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन आहे. तसेच हा Asus चा पाहिलं असा मोबाईल फोन आहे जो बजेट किंमतीत लॉन्च केला गेला आहे. सोबतच यात तुम्हाला गोरिला ग्लास 6 ची सुरक्षा पण मिळत आहे. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट पण मिळत आहे.
आता Realme 2 Pro मोबाईल फोन बद्दल बोलूया हा एका 6.3-इंचाच्या FHD+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. या मोबाईल फोनची स्क्रीन 2280×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह येते. यात तुम्हाला एक ड्यू ड्राप नॉच पण मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये पण तुम्हाला एक फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर पण मिळत आहे.
हार्डवेयर
Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे. यह मोबाईल फोन तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट्स मध्ये येतो. हा मोबाईल फोन 3GB/32GB, 4GB/64GB आणि 6GB/64GB स्टोरेज वेरीएंट मध्ये विकत घेता येईल. तसेच यात तुम्हाला तीन स्लॉट पण मिळत आहेत, जे तुम्ही दोन सिम आणि एका माइक्रोएसडी कार्डसाठी वापरू शकता. तसेच जर तुम्ही स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर तुम्ही ती 2TB पर्यंत वाढवू शकता.
आता Realme 2 Pro स्मार्टफोन कडे पाहू, हा पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह येतो आणि हा डिवाइस पण तीन वेगवगेळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा मोबाईल फोन तुम्ही 4GB/64GB, 6GB/64GB आणि 8GB/128GB स्टोरेज वेरिएंट्स मध्ये घेऊ शकता. हि स्टोरेज तुम्ही Asus Zenfone Max Pro M2 प्रमाणे वाढवू शकता.
कॅमेरा
Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल 12MP+5MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे, या कॅमेऱ्यातून तुम्ही 4K विडियो रेकॉर्ड करू शकता. तसेच यात तुम्हाला Pro मोड पण मिळत आहे. असे पण समोर येत आहे की येत्या काही महिन्यांत या फोनला FOTA अपडेट मिळणार आहे, त्यानंतर या मोबाईल फोनला AI सीन डिटेक्शन मिळेल. याच्या फ्रंट पॅनल वर तुम्हाला एक 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फ्रंट फ्लॅश पण मिळत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही पोर्ट्रेट फोटो पण घेऊ शकता.
Realme 2 Pro स्मार्टफोन पहिला तर यात पण तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये एक 16MP चा प्राइमरी आणि एक 2MP चा डेप्थ सेकेंडरी कॅमेरा मिळत आहे. फोनच्या फ्रंटला तुम्हाला एक 16MP चा AI आधारित कॅमेरा सेंसर मिळत आहे.
किंमत
किंमती बद्दल चर्चा करायची झाल्यास लक्षात घ्या की Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोनची किंमत Rs 12,999 पासून सुरु होत आहे, हि किंमत याच्या बेस वेरीएंटची आहे. Realme 2 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल फोन तुम्ही 13,990 रुपयांच्या बेस किंमतीती घेऊ शकता. Asus Zenfone Max Pro M2 मोबाईल फोन 18 डिसेंबर पासून सेल साठी Flipkart च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे, हा मोबाईल फोन ब्लू आणि टाइटेनियम रंगांत विकत घेता येईल.