Asus ROG फोन आणि Oppo Find X मध्ये कोण देत आहे चांगले स्पेक्स

Asus ROG फोन आणि Oppo Find X मध्ये कोण देत आहे चांगले स्पेक्स
HIGHLIGHTS

गेमिंग फोन Asus ROG आणि Oppo Find X मध्ये स्पेसिफिकेशनची तुलना करून आपल्याला समजेल कोणता स्मार्टफोन चांगले स्पेक्स ऑफर करतो.

महत्त्वाचे

  • Asus ROG जगातील पहिला असा फोन आहे जो 3D वेपर चेम्बर कूलिंग टेक्नॉलॉजी सह येतो.
  • Oppo Find X स्मार्टफोन Asus ROG पेक्षा 10,000 रूपये स्वस्त आहे.
  • दोन्ही फोन्स फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 वर चालतात.

Asus ROG भारतात लॉन्च झाला आहे. हा गेमिंग स्मार्टफोन लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर सह येतो. हा जगातील पहिला असा फोन आहे जो 3D वेपर चेम्बर कूलिंग टेक्नॉलॉजी सह येतो. या फोन मध्ये 6.0 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिसपोंस टाइम 1ms आहे. तसेच Oppo च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Find X बद्दल बोलायचे झाले तर हा 3D स्टील्थ कॅमेऱ्यासह येतो ज्यात अनेक टेक्नॉलॉजी आहेत. इथे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्सची तुलना करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की स्पेक्स आणि फीचर्सच्या आधारावर दोघानांपैकी कोणता स्मार्टफोन विकत घेणे चांगले.

डिस्प्ले

Asus “ROG” एक गेमिंग स्मार्टफोन आहे जो हार्डकोर गेमर्स साठी बनवण्यात आला आहे. या फोन मध्ये 6.0 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिसपोंस टाइम 1ms आहे. एक नजर Oppo Find X वर टाकल्यास हा डिवाइस 6.4 इंचाच्या FHD+ डिस्प्ले सह येतो, जो पूर्णपणे बेजल-लेस आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.8% आहे.

प्रोसेसर आणि मेमरी

दोन्ही स्मार्टफोन्स लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर वर चालतात. पण Asus ROG मध्ये 8GB/128GB स्टोरेज मॉडेल देण्यात आला आहे, तर Oppo Find X 8GB/256GB स्टोरेज सह उपलब्ध आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर Oppo Find X मध्ये 16MP + 20MP चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच डिवाइसच्या फ्रंटला 25MP चा AI आधारित कॅमेरा देण्यात आला आहे. Asus ROG बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 12+8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

किंमत

Oppo Find X स्मार्टफोन Asus ROG पेक्षा 10,000 रुपयांनी स्वस्त आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन वर Rs 59,990 मध्ये उपलब्ध आहे तर Asus ROG फ्लिपकार्ट वरून Rs 69,990 मध्ये विकत घेता येईल.

Asus ROG एक गेमिंग स्मार्टफोन आहे जो 3D वेपर कूलिंग चेम्बर आणि एयर ट्रिगर्स सह येतो. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे, रिसपोंस टाइम 1ms आहे. हा फोन त्या युजर्ससाठी चांगला ठरू शकतो जे जास्त गेमिंग करतात. जर युजरला एका चांगला कॅमेरा आणि चांगला डिस्प्ले असलेला फोन हवा असेल तर Oppo Find X घेता येईल.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo