Sony Xperia XZ2 स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात Rs 72,990 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
Sony Xperia XZ2 स्मार्टफोन सोनी सेंटर्स आणि काही रिटेल स्टोर्स मधून सेल साठी आला आहे. सोनी ने Xperia XZ2 आणि Xperia XZ2 Compact स्मार्टफोंस MWC 2018 मध्ये सर्वात आधी लॉन्च करण्यात आले होते. तसेच गेल्याच आठवड्यात Sony Xperia XZ2 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले होते. या डिवाइस ची भारतात किंमत Rs 72,990 आहे.
या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 5.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळत आहे, जी 1080×2160 पिक्सल ची एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह 6GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मधील स्टोरेज सह माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. हा डिवाइस सर्वात आधी MWC 2018 मध्ये सादर करण्यात आला होता.
फोन मध्ये एक 19-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच यात एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन मध्ये वायरलेस चार्जिंग सोबत IP68 चे सर्टिफिकेशन पण आहे. तसेच यात एक 3180mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.