Sony Xperia XA2 Plus स्मार्टफोन 6-इंचाच्या डिस्प्ले आणि या फीचर्स सह लॉन्च; जाणून घ्या किंमत
तैवान मध्ये झालेल्या एका इवेंट मधून Sony ने आपला Sony Xperia XA2 Plus स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
तैवान मध्ये झालेल्या एका इवेंट मधून Sony ने आपला Sony Xperia XA2 Plus स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या डिवाइस मध्ये पण सोनी ने आपली डिजाईन ची परंपरा कायम ठेवली आहे. बोलले जात होते की सोनी कडून त्यांच्या डिजाईन मध्ये काही बदल केले जाणार आहेत, पण असे काहीच या डिवाइस मध्ये दिसत नाही. या डिवाइस मध्ये पण तुम्हाला एक मोठा डिस्प्ले आणि थिन बेजल्स मिळत आहेत.
Sony Xperia XA2 Plus ची किंमत
Sony Xperia XA2 Plus स्मार्टफोन NT 15,990 डॉलर मध्ये तैवान मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जर हीच किंमत आपण भारतीय रुपयांत रुपांतरीत केली तर ती जवळपास Rs 36,500 होईल. हे बघून असे वाटते की हा एक हाय एंड डिवाइस आहे ज्याची किंमत जास्त आहे.
Sony Xperia XA2 Plus स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Sony Xperia XA2 Plus क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 सोबत लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला 6GB च्या रॅम सोबत 64GB ची स्टोरेज पण मिळत आहे. फोन मध्ये एक 6-इंचाचा FHD+ 2160×1080 पिक्सल रेजोल्यूशन चा डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 23-मेगापिक्सल चा मेन कॅमेरा देण्यात, तसेच फोन च्या फ्रंट ला तुम्हाला एक 8-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. फोन मध्ये एक 3580mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते. बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी कंपनी ने यात बॅटरी मॅनेजमेंट पण दिले आहे.
फोन दोन वेरिएंट्स मध्ये घेता येईल, हा तुम्ही 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट सोबत 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मध्ये पण घेऊ शकता. फोन ची ही स्टोरेज जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही ती 400GB पर्यंत वाढवू शकता. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो.
Siddharth Parwatay
Siddharth a.k.a. staticsid is a bigger geek than he'd like to admit. Sometimes even to himself. View Full Profile