मोबाईल निर्माता कंपनी सोनीने MWC 2016 दरम्यान आपले तीन नवीन स्मार्टफोन्स एक्सपीरिया X, एक्सपीरिया XA आणि X परफॉर्मन्ससह सादर करेल. एक्सपीरिया X रेंज शिवाय सोनीने एक्सपीरिया इयर, एक्सपीरिया आय आणि एक्सपीरिया प्रोजेक्टर सारखे डिवाइससुद्धा लाँच केले आहेत.
सोनी एक्सपीरिया X, सोनी एक्सपीरिया X परफॉर्मन्स आणि एक्सपीरिया XS फोन व्हाइट, ग्रेफाइट, लाइम गोल्ड आणि रोज गोल्ड रंगात मिळतील. ह्याच्या किंमतीचा खुलासा स्थानीय लाँचनुसार होईल. ह्या स्मार्टफोनसह मॅचिंग स्टाइल कवरसुद्धा उपलब्ध होतील.
सोनीचे हे तीनही स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. हे सिंगल आणि ड्यूल सिम प्रकारात उपलब्ध होतील.एक्सपीरिया X ड्यूल, एक्सपीरिया XA ड्यूल आणि एक्सपीरिया X परफॉर्मन्स ड्यूल X सीरिजचे ड्यूल सिम प्रकारात असतील.
ह्या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, सोनी एक्सपीरिया X आणि एक्सपीरिया X परफॉर्मन्समध्ये स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आह्. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये LED फ्लॅश असलेला 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो.
सोनी एक्सपीरिया X परफॉर्मनेसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले गेले आहे आणि एक्सपीरिया X मध्ये क्वालकॉम 650 प्रोेसेसर दिले गेले आहे. एक्सपीरिया X स्मार्टफोनचे परिमाण 143.7×7.0x8.7mm आहे आणि ह्याचे वजन 164 ग्रॅम आहे. ह्यात 2700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
सोनी एक्सपीरिया XA स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या फोनमध्ये मिडियाटेक MT6755 प्रोसेसर आणि 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 वर चालतो ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 2300mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनचे परिमाण 143.6×66.8×7.9mm आणि वजन 138 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – लावा आयरिश अॅटम 2X आणि ओप्पो जॉय प्लस यांची तुलना
हेदेखील वाचा – LeEco Le 1S:२५ फेब्रुवारीपासून मिळणार रजिस्ट्रेशनशिवाय