सोनी एक्सपिरिया X आणि एक्सपिरिया XA स्मार्टफोन्ससाठी भारतात प्री-रजिस्ट्रेशन सुरु झाली आहे.
ह्या स्मार्टफोनशी संबंधित माहिती कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर दिली गेली आहे. आशा आहे की, कंपनी लवकरच ह्या फोन्सच्या किंमतीविषयी माहिती देईल.
सोनीने आपले हे फोन्स MWC 2016 दरम्यान लाँच केले होते. तथापि, आतापर्यंत ह्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही, की हे स्मार्टफोन्स भारतात ड्यूल सिम सपोर्टसह येणार की नाही. हे दोन्ही फोन्स पांढ-या, काळ्या, सोनेरी आणि रोझ गोल़्ड रंगात उपलब्ध होईल. सोनी एक्सपिरिया X आणि XA स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर आधारित आहे.
हेदेखील पाहा – [Marathi] Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
सोनी एक्सपिरिया X स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसरने आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असू शकते. हे स्टोरेज मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो. ह्या फोनमध्ये 23 मेगापिक्सेलचा रियर कॅेमेरा आणि 13 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्या फोनमध्ये 2620mAhची बॅटरी दिली गेली आहे. ह्याचे वजन 153 ग्रॅम आहे.
सोनी एक्सपिरिया XA स्मार्टफोनमध्ये ह्यात 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या फोनमध्ये मिडियाटेक MT6755 प्रोसेसर आणि 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 वर चालतो ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 2300mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनचे परिमाण 143.6×66.8×7.9mm आणि वजन 138 ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोनच्या किंमतीत झाली खूप मोठी घट
हेदेखील वाचा – ७००० रुपयांच्या आत येणारा अल्काटेल पॉप स्टार स्मार्टफोन लाँच