सोनीने भारताता एक्सपीरिया X आणि XA ला ४८,९९० रुपये आणि २०,९९० रुपयात लाँच केले. हे दोन्ही फोन्स ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हे 4G सपोर्टसह येतात. हे स्मार्टफोन्स रिटेल स्टोर्स आणि ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर सेलसाठी उपलब्ध होतील. सोनी एक्सपिरिया X स्मार्टफोन ७ जूनपासून उपलब्ध होऊ शकतो. ह्या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग अधिकृत सोनी मोबाईल डिलर्स आणि ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर केली जाऊ शकते. हा फोन व्हाइट, लाइम गोल्ड आणि ओरसे गोल्ड रंगात उपलब्ध होईल. एक्सपीरिया XA जूनच्या तिस-या हफ्त्यात उपलब्ध होईल. ह्या फोनसह यूजर्सला काही मोफत कंटेंटसुद्धा मिळतील जसे की, सोनी LIV, हंगामा प्ले आणि गेमलॉफ्ट. ह्या फ्री-कंटेंटची किंमत २७०० रुपये आहे.
सोनी एक्सपिरिया X स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर आहे. ह्यात 3GB रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्यात 23 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेल आहे. हा फोन 2620mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्याची बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देईल.
हेदेखील वाचा – .. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य
सोनी एक्सपिरिया XA स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्यात मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसरसह 2GB ची रॅमसुद्धा दिली आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. हा फोन 2300mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो V6.0 वर काम करतो.
हेदेखील वाचा – आसूसच्या ह्या नवीन झेनबुक 3 लॅपटॉपमध्ये आहे 1TB SSD स्टोरेज
हेदेखील वाचा – ट्विटर लवकरच लाँच करणार नाइट मोड फीचर