7 जानेवारीला होऊ शकतो Sony Xperia सीरीजचा खुलासा

Updated on 03-Jan-2019
HIGHLIGHTS

लवकरच सोनी आपल्या Xperia सीरीजचा खुलासा करू शकते. रिपोर्ट्स नुसार याच महिन्यात म्हणजे 7 जानेवारीला कंपनी ट्रेड फेयर मध्ये Xperia XA3, Xperia XA3 Ultra आणि Xperia L3 स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

महत्वाचे मुद्दे:

  • Sony Xperia XA3, Xperia XA3 Ultra, Xperia L3 होऊ शकतात लॉन्च
  • Sony Xperia XA 3 मध्ये असू शकतो 5.9 इंच डिस्प्ले
  • Xperia XA3 Plus पण लॉन्च मध्ये होऊ शकतो सामील

 

स्मार्टफोन निर्माता कंपनी Sony पुढल्या आठवड्यात म्हणजे 7 जानेवारीला कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो 2019 (CES trade fair) मध्ये आपले Xperia XA3, Xperia XA3 Ultra आणि Xperia L3 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण इवेंट CES 2019 मध्ये कंपनी आपले कोणते डिवाइस समोर आणणार आहे, याबद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे याआधी पण कंपनी ने Sony Xperia XA2, Sony Xperia XA2 Ultra आणि Sony Xperia L2 CES 2018 मध्ये लॉन्च केले होते.

Sony Xperia XA3 आणि Xperia XA3 सह असे असू शकतात Sony Xperia L3 चे स्पेसिफिकेशन

रिपोर्ट्स नुसार Xperia X सीरीज स्मार्टफोन एंड्रॉयड 9 पाई सह येऊ शकतात. यासोबतच सिक्योरिटी साठी फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर कंपनी सादर करू शकते. तसेच जर ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर फोनच्या मागे दोन रियर कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी युजर्सना Sony Xperia XA3 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर मिळू शकतो.

त्याचबरोबर हॅन्डसेट मध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. Sony Xperia XA3 आणि Sony Xperia XA3 Ultra मध्ये 5.9 इंचाचा (1080×2160 पिक्सल) डिस्प्ले आणि 6.5 इंचाचा (1080×2160 पिक्सल) डिस्प्ले असल्याचे बोलले जात आहे. तसेच कनेक्टिविटी मध्ये या दोन्ही डिवाइसना वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन/एसी आणि ब्लूटूथ वर्जन 5.0 सपोर्ट मिळू शकतो.

Sony Xperia L3 च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर FCC लिस्टिंग वरून समजले होते कि हा स्मार्टफोन यूएसबी टाइप-सी पोर्टला सपोर्ट करतो. याआधी फोन मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले असल्याचे सांगण्यात आले होते ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 18:9 असू शकतो.

त्याचबरोबर Gizmochina च्या रिपोर्ट नुसार Xperia L3 मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर असू शकतो. हा ड्यूल रियर कॅमेरा सेट-अप सह प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आणि सेकेंडरी सेंसर 5 मेगापिक्सल सह येऊ शकतो. यात फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :