दीर्घ प्रतीक्षेनंतर SONY चा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल, मिळेल उत्तम कॅमेरा आणि डिस्प्ले

दीर्घ प्रतीक्षेनंतर SONY चा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल, मिळेल उत्तम कॅमेरा आणि डिस्प्ले
HIGHLIGHTS

लांब कालावधीनंतर Sony चा नवीन फोन लाँच

कंपनीने Sony Xperia 5 IV फोन नुकताच लाँच केला आहे

नव्या फोनची किमंत सुमारे 80 हजार रुपये

बऱ्याच दिवसांनंतर SONY ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या या नवीन हँडसेटचे नाव Sony Xperia 5 IV आहे. हा स्मार्टफोन उत्तम डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि उत्तम ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. कंपनीने नुकताच हा फोन युरोप आणि यूएसमध्ये लाँच केला आहे. युरोपमध्ये त्याची किंमत 1049 युरो म्हणजेच सुमारे 83,700 रुपये आहे आणि यूएसमध्ये ती $ 999 म्हणजेच सुमारे 80 हजार रुपये आहे. कंपनी हा फोन भारतात कधी लॉन्च करेल याबाबत अद्याप माहिती नाही. 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! 50MP कॅमेरा असलेला Realme फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, वाचा डिटेल्स

Sony Xperia 5 IV

फोनमध्ये, कंपनी 2520×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंच फुल एचडी + OLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह येत असलेल्या या फोनला IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे. हा नवीनतम सोनी फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे.

याशिवाय कंपनी फोनमध्ये Qi वायरलेस चार्जिंगची सुविधाही देत ​​आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर काम करतो. दमदार साउंडसाठी या फोनमध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, 3.5mm हेडफोन जॅक आणि Wi-Fi व्यतिरिक्त, फोनमध्ये सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन दिले गेले आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमधील तीन कॅमेरे 12 मेगापिक्सलचे आहेत. दरम्यान, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo