Sony Xperia XZ2 Premium स्मार्टफोन लवकरच येऊ शकतो चीन मध्ये, TENAA कडून मिळाले सर्टिफिकेशन

Updated on 07-Jun-2018
HIGHLIGHTS

Sony आपला Sony Xperia XZ2 Premium स्मार्टफोन आधीच लॉन्च केला आहे, पण चीन मध्ये हा डिवाइस अजून लॉन्च करण्यात आला नाही.

सोनी ने एप्रिल महिन्यात आपला Sony Xperia XZ2 Premium स्मार्टफोन लॉन्च केला होता, पण हा फ्लॅगशिप डिवाइस अजून पर्यंत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला नाही. आता असे समोर येत आहे की हा डिवाइस लवकरच चीन मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे सोनी चा दुसरा डिवाइस Sony Xperia XZ2 इथे विकला जात आहे, पण प्रीमियम डिवाइस इथे अजूनपर्यंत लॉन्च पण करण्यात आला नाही. आता या डिवाइस ला चीन च्या TENAA कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे, याचा अर्थ असा हा डिवाइस आता चीन मध्ये लवकरच लॉन्च केला जाईल. 

हा मॉडेल TENAA वर 31 मे ला पास करण्यात आला होता, पण तिथे हा लांब मॉडेल नंबर सह दिसला होता, फोन तिथे मॉडेल नंबर H8166 सह दिसला होता. या डिवाइस च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या लिस्टिंग वरून समोर आले आहे की हा डिवाइस 5.8-इंचाच्या डिस्प्ले सह दिसू शकतो, परंतु याच्या रेजोल्यूशन बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही. 

जर XZ2 Premium स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा 4K रेजोल्यूशन सह लॉन्च करण्यात आला होता. आता इथे या लिस्टिंग मध्ये जो फोन दिसला आहे, तसेच XZ2 Premium स्मार्टफोंस पाहता या दोन्हींचे डाइमेंशन्स एक सारखे आहेत.  

या लिस्टिंग मध्ये डिवाइस 3,400mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह दिसला आहे, जी सोनी च्या XZ2 आणि XZ2 Premium सोबत मेळ खात नाही. प्रीमियम डिवाइस पाहता यात 3,540mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. हे पाहून असे वाटते आहे की चीन मध्ये हा डिवाइस कोणत्या तरी नवीन नावाने आणि काही बदललेल्या स्पेक्स सह लॉन्च केला जाऊ शकतो आता तरी आपण काही ठाम पणे बोलू शकत नाही या बाबत. 

Sony Xperia XZ2 Premium स्मार्टफोन च्या काही स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका फ्लॅगशिप डिवाइस प्रमाणे लॉन्च करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की यात तुम्हाला जबरदस्त स्पेक्स आणि फीचर देण्यात आले आहेत या डिवाइस मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह 6GB चा रॅम तसेच 64GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, त्याचबरोबर हेही लक्षात असू दे की ही स्टोरेज तुम्ही 400GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. आता हा डिवाइस चीन मध्ये किती लवकर लॉन्च केला जातो याची वाट बघावी लागेल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :