Sony च्या या Xperia स्मार्टफोन्सच्या किंमतीत Rs 10,000 पर्यंतची मोठी कपात

Updated on 17-Oct-2018
HIGHLIGHTS

आर तम्ही Sony चा एकादा Xperia मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्या कि काही Experia मोबाईल फोन्सच्या किंमतीत Rs 10,000 पर्यंतची कपात करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया कि हे कोणते Xperia मोबाईल फोन्स आहेत ज्यांची किंमत कमी झाली आहे.

तुम्हाला तर माहितीच आहे कि भारतात सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, नुकतेच आपण एक दोन दिवसांपूर्वीच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिप्कार्ट, अमेझॉन इंडिया आणि Paytm Mall वर होणारे सेल संपताना पहिले आहेत. पण या सेल मध्ये सोनीचे मोबाईल फोन्स दिसले नव्हते. पण आता समोर येत आहे कि Sony च्या जवळपास 6 Experia मोबाईल फोन्सची कंपनी कडून किंमत कमी केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या मोबाईल फोन्स च्या किंमतीत जवळपास Rs 10,000 पर्यंतची कपात करण्यात आलेली दिसून येत आहे. ज्या Sony Xperia मोबाईल फोन्सच्या किंमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे त्यात Sony Xperia R1, Xperia R1 Plus, Xperia XA1, Xperia XA1 Plus, Xperia XZ1, आणि Xperia XZ Premium मोबाईल फोन्स यांचा समावेश आहे. या सर्व मोबाईल फोन्स वर तुम्हाला जवळपास Rs 10,000 ची कपात झालेली दिसेल. चला तर मग बघूया कि यांची किंमत काय होती आणि आता काय झाली आहे.

Sony Xperia मोबाईल फोन्सची किंमत झाली कमी

सर्वात आधी Sony Xperia R1 मोबाईल फोनच्या किंमतीबद्दल बोलूया, या मोबाईल फोनची किंमत आधी Rs 9,490 होती,पण आता तुम्ही हा फक्त Rs 7,990 मध्ये घेऊ शकता. विशेष म्हणजे या मोबाईल फोनची लॉन्च प्राइस Rs 12,990 होती. तसेच जर Sony Xperia R1 Plus बद्दल बोलायचे झाले तर हा तुम्ही बाजारातून जवळपास Rs 12,990 मध्ये घेऊ शकत होता पण आता तुम्ही हा Rs 10,990 मध्ये घेऊ शकता. तसेच जर आपण Sony Xperia XA1 मोबाईल फोन पहिला तर याची किंमत Rs 17,990 होती. पण आता तुम्ही हा फक्त Rs 12,990 मध्ये घेऊ शकता, याचा अर्थ असा आहे कि याच्या किंमतीती Rs 5,000 ची मोठी कपात झाली आहे.

जर आपण Sony Xperia XA1 Plus मोबाईल फोन पहिला तर हा जवळपास Rs 19,990 मध्ये मिळत होता, पण आता तुम्ही हा फक्त Rs 14,990 मध्ये घेऊ शकता. याचा अर्थ असा कि या मोबाईल फोनची किंमत पण Rs 5,000 ने कमी झाली आहे.

आता बघूया Sony चे प्रीमियम Xperia मोबाईल फोन्स आणि या यादीत Sony Xperia XZ1 आणि Xperia XZ Premium येतात. या दोन्ही मोबाईल फोन्सच्या किंमतीती टेलीकॉमटॉक च्या एका रिपोर्ट नुसार Rs 10,000 पर्यंतची कपात करण्यात आली आहे. Xperia XZ1 मोबाईल फोनची किंमत Rs 44,990 होती, पण आता तुम्ही हा फक्त Rs 34,990 मध्ये घेऊ शकता. याचा अर्थ असा कि तुम्ही हा Rs 10,000 ने कमी किंमतीती घेऊ शकता. तसेच Sony Xperia XZ Premium ची किंमत Rs 49,990 होती, पण आता तुम्ही हा फक्त Rs 39,990 मध्ये घेऊ शकता.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :