सोनीच्या पेटेंट ने केला ट्रांसपेरेंट डिस्प्ले सह येणाऱ्या स्मार्टफोन कडे ईशारा

सोनीच्या पेटेंट ने केला ट्रांसपेरेंट डिस्प्ले सह येणाऱ्या स्मार्टफोन कडे ईशारा
HIGHLIGHTS

सोनी ने पेटेंट फाईल केला आहे ज्यात एक स्मार्टफोन दोन डिस्प्ले सह दिसत आहे आणि डिस्प्ले ऑपेक, ट्रांसपेरेंट किंवा ट्रांस्लुसेंट वर सेट केला जाऊ शकतो आहे.

फोल्डेबल स्मार्टफोन्स सध्या स्मार्टफोन टेक्नॉलॉजी मधील आगामी मोठा बदल म्हणून समोर येत आहेत. एकीकडे सॅमसंग आधीपासूनच पुढच्यावर्षी आपला फोल्डेबल फोन लॉन्च करण्याची तयारी करत असताना आता असे समोर येत आहे कि सोनी पण अशा प्रकारचा स्मार्टफोन आणू शकते. कंपनीने एक पेटेंट फाईल केले आहे ज्यातून स्मार्टफोन मधील एका ट्रांसपेरेंट डिस्प्ले मेथड ची माहिती मिळाली आहे.

LetsGoDigital ने सर्वात आधी दाखवण्यात आलेल्या या पेटेंट मध्ये स्मार्टफोनचा डिस्प्ले भागांत दिसत आहे. एक डिस्प्ले फ्रंट वर आणि एक बॅक वर आहे. हा सहा वेगवगेळ्या अलग मोड्स मध्ये सेट करून वापरला जाऊ शकतो, यासाठी हा ऑपेक, ट्रांसपेरेंट किंवा ट्रांस्क्लुसेंट वर सेट करावा लागेल. वेबसाइट वर काही रेंडर्स पण पोस्ट करण्यात आलेले आहेत ज्यावरून स्मार्टफोन कसा दिसेल ते दिसते. 

एवढेच नव्हे तर हि टेक्नॉलॉजी कंपनीला बाजारात पुन्हा परत येण्यास मदत करू शकते. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे जरी सोनी कडे या डिवाइसचे पेंटेंट असले तरी ते भविष्यात लागूच होईल असे नाही.

2019 मध्ये स्मार्टफोन्स मध्ये अनेक वेगवेगळे बदल बघायला मिळणार आहेत. सॅमसंग आधी फोल्डेबल डिवाइसेज लॉन्च करण्याची तयारी करत आहे तर अनेक स्मार्टफोन निर्माता 5G वर फोकस करणार आहेत.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo