Sony Xperia XA2 Plus स्मार्टफोन दमदार कॅमेरा सह लॉन्च, यात आहे Hi-Res ऑडियो फीचर
Sony ने आपल्या आगामी स्मार्टफोन Sony Xperia XA2 Plus ला आपल्या अधिकृत सोनी ब्लॉग लिस्टिंग च्या माध्यमातून लॉन्च केले आहे. या डिवाइस मध्ये कंपनी ने माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण दिला आहे, जो वापरून यूजर्स याची स्टोरेज 400GB पर्यंत वाढवू शकतात.
Sony Launches Sony Xperia XA2 Plus Smartphone with Some Interesting Features: Sony ने आपल्या आगामी स्मार्टफोन Sony Xperia XA2 Plus ला आपल्या अधिकृत सोनी ब्लॉग लिस्टिंग च्या माध्यमातून लॉन्च केले आहे. सोनी एक्सपीरिया एक्सए2 प्लस ला मिड-रेंज सेगमेंट मधील इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आला आहे. सोनी एक्सपीरिया एक्सए2 प्लस ऑगस्ट महिन्याच्या शेवटी बाजारात विक्रीसाठी येऊ शकतो. या लिस्टिंग वरून अशीच माहिती मिळत आहे. हे लिस्टिंग पेज पाहता या डिवाइस मध्ये तुम्हाला 6GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर मिळत आहे. त्याचबरोबर सोनी एक्सपीरिया एक्सए2 प्लस चा एक 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज वाला वेरिएंट पण लॉन्च करण्यात आला आहे.
Sony Xperia XA2 Plus चे स्पेसिफिकेशन
कंपनी ने डिवाइस सोबत तुम्हाला माइक्रोएसडी कार्ड चा सपोर्ट पण दिला आहे. याचा फायदा त्या यूजर्सना जास्त होईल ज्यांना जास्त स्टोरेज ची गरज असते. या डिवाइस ची स्टोरेज तुम्ही याच्या मदतीने 400GB पर्यंत वाढवू शकता. त्याचबरोबर कंपनी ने हा डिवाइस सिंगल सिम आणि ड्यूल सिम दोन्ही वेरिएंट्स मध्ये पण लॉन्च केला आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6-इंचाचा FHD+ डिस्प्ले 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळत आहे, हा कंपनी ने याला कोर्निंग गोरिला ग्लास 5 चे प्रोटेक्शन दिले आहे.
फोन डायमंड कट फिनिश सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात तुम्हाला मेटॅलिक फिनिश पण मिळत आहे. या
डिवाइस मध्ये एक फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे, जो याच्या बॅक वर तुम्हाला मिळेल. तसेच डिवाइस मध्ये एक 23-मेगापिक्सल चा कॅमेरा पण आहे.
फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर यात एक 8-मेगापिक्सल चा सेल्फी सेंसर आहे. हा डिवाइस एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो, सोबतच यात एक 3,580mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, जी ANOVO Adaptive चार्जिंग, बॅटरी केयर आणि क्विक चार्ज 3.0 च्या सपोर्ट सह येते. तसेच कंपनी ने यात एक स्टॅमिना मोड पण दिला आहे. त्याचबरोबर यात High-Resolution Audio सोबत LDAC, Stereo Recording, DSEE HX, SmartAmplifier, Clear Audio, Clear Bass असे अनेक फीचर आहेत.