Redmi Note 5 Pro च्या यूजर्सना हेडफोन वापरताना आला लो ऑडियो चा अनुभव

Updated on 08-Mar-2018
HIGHLIGHTS

या समस्येला ठीक करण्यासाठी कंपनी ने MIUI 9.2.5 अपडेट रोल आउट करायाला सुरवात केली आहे.

मागच्या महिन्यात शाओमी ने आपले लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 5 आणि Redmi Note 5 Pro ला लॉन्च केले. सोबत कंपनी ने Note 5 Pro मध्ये फेस अनलॉक फीचर सक्षम करण्यासाठी MIUI 9.2.4.0 अपडेट सुरू केला आहे. पण काही यूजर्सना हेडफोन वापरताना लो ऑडियो च्या समस्येला सामोरे जावे लागले. 
ही समस्या तेव्हा नाही येत जेव्हा ऑडियो साठी मुख्य स्पीकर चा वापर करण्यात येतो. शाओमी ने सांगितले आहे की ते लवकरच डिवाइस साठी एक अपडेट रोल आउट करतील.
फेस अनलॉक सुविधा काही दिवसांपूर्वी Redmi Note 5 Pro साठी MIUI v9.2.4 NEIMIEK अपडेट सह सुरू करण्यात आली होती. शाओमी ने मार्च च्या शेवटपर्यंत ही सुविधा रोल आउट करण्याची घोषणा केली होती. Redmi Note 5 Pro कंपनी चा पहिला स्मार्टफोन असेल, ज्यात फेस अनलॉक फीचर ची सुविधा असेल.
Redmi Note 5 आणि Note 5 Pro स्मार्टफोन्स 14 फेब्रुवारी ला Mi LED Smart TV 4 सह लॉन्च करण्यात आले होते. कंपनी ने भारतात टीवी ची एक नवीन सीरीज Mi LED Smart TV 4A पण लॉन्च केली आहे. ही 32 इंचाच्या मॉडल सह येते, ज्याची किंमत 13,999 रुपए आहे आणि 43 इंच वेरियंट ची किंमत 22,999 रुपए आहे.
नव्या टेलीविजन सीरीज च्या 55 इंचाच्या Mi LED स्मार्ट TV 4, 60fps वर 4K HDR वीडियो स्ट्रीम करू शकता. 43 इंच आणि 32 इंचाचा नवीन स्मार्ट TV 4A सीरीज क्रमश: फुल HD आणि HD रेडी वीडियो प्लेबॅक ला सपोर्ट करताता. दोन्ही वेरियंट मध्ये 10 वाट चा स्टीरियो स्पीकर आहे आणि जो डीटीएस साउंड ला सपोर्ट करतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :