मायक्रोसॉफ्ट 1 फेब्रुवारीला लाँच करणार आपला शेवटचा लुमिया फोन

मायक्रोसॉफ्ट 1 फेब्रुवारीला लाँच करणार आपला शेवटचा लुमिया फोन
HIGHLIGHTS

मिळालेल्या माहितीनुसार, असे सांगितले जातय की, मायक्रोसॉफ्ट आपला नवीन लुमिया स्मार्टफोन १ फेब्रुवारीला लाँच करणार आहे आणि हा कंपनीचा शेवटचा लुमिया फोन असू शकतो.

काही नवीन बातम्यांनुसार असे सांगितले जातय की, फेब्रुवारी महिन्यात १ तारखेला मायक्रोसॉफ्ट आपला नवीन आणि शेवटचा स्मार्टफोन लूमिया 650 लाँच करण्याच्या तयारीत आहे. विंडोज सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, लूमिया 650 मायक्रोसॉफ्टकडून शेवटचा लूमिया फोन असू शकतो.

 

मागील महिन्यात मायक्रोसॉफ्टने अशी माहिती दिली होती की, कंपनी एक अशा स्मार्टफोनवर काम करत आहे, जो हाय एन्ड असणार आहे आणि आता अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, की ह्या स्मार्टफोनमध्ये हँडसेटमध्ये क्वालकॉमच्या चिपसेटच्या स्थानावर इंटेलचा आकर्षक प्रोसेसर असू शकतो. त्याचबरोबर हा २०१६ मध्ये शेवटच्या सहा महिन्यांत लाँच केले जाऊ शकतो.

हया रिपोर्टमध्ये असेही सांगितले गेले आहे की, मायक्रोसॉफ्ट लूमिया 650 विषयी अधिकृत ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली जाईल. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी माहिती दिली आहे. तर मायक्रोसॉफ्टकडून ह्याविषयी अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ह्या बातमीवर आपण पुर्ण विश्वासही ठेवू शकत नाही. मात्र जर मायक्रोसॉफ्ट ह्याविषयी घोषणा करतो, तर ही बातमी खरी ठरेल.

ह्याआधीही ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. ज्यात असे सांगितले गेले होते की, लूमिया 650 विंडोज 10 वर काम करेल. त्याचबरोबर ह्यात ५ इंचाची HD डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर, 1GB रॅम, 8GB च्या अंतर्गत स्टोरेज दिला जाणार आहे. ह्यात LED फ्लॅशसह 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये 2000mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळेल.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo