Smartphones Tips: सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्रातील छोट्या मोठ्या गोष्टी आजकाल प्रत्येकाला समजतात. युजर यु-ट्यूबच्या टेक टिप्स व्हीडिओद्वारे फोनबद्दल अनेक अडचणी स्वतःहून दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा परीस्थितीत अनेक लोक स्वत:ला स्मार्टफोनचे तज्ञ समजतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्हाला सुद्धा फोनबद्दल सर्व काही माहित आहे आणि मोबाईल फोनमध्ये कोणतीही समस्या येणार नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही जर तुमच्या फोनसह प्रयोग केले तर तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते. अशाप्रकारचे नुकसान टाळण्यासाठी पुढील चुका कधीही करू नका.
Also Read: Jio चा सर्वात स्वस्त OTT प्लॅन! किंमत फक्त 175 रुपये आणि भरपूर डेटा देखील उपलब्ध
पावसाळ्यात ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेर पडल्यास अनेक वेळा फोनमध्ये पाणी शिरते. अशा परिस्थितीत अनेकजण फोन स्वतः उघडून दुरुस्त करण्यास सुरुवात करतात. जर तुम्हीही अशी चूक केली तर, यामुळे डिव्हाइसचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून फोनमध्ये पाणी शिरल्यास तुम्ही अधिकृत सेवा केंद्राला डिव्हाइस दाखवा, जेणेकरून फोन योग्यरित्या दुरुस्त करता येईल.
आजकाल फोनच्या बॅटरीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आणि युजर स्वत: बॅटरी बदलण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमच्या फोनचेही नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. फोनमध्ये लिथियम बॅटरी उपलब्ध असते. अशा स्थितीत बॅटरी हाताळताना थोडा सुद्धा निष्काळजीपणा बॅटरीचे स्फोट होण्यास कारणीभूत ठरेल.
आपणा सर्वांना माहितीच आहे की, स्मार्टफोनची स्क्रीन खूपच नाजूक असते. त्यामुळे स्क्रीनवर जास्त दबाव टाकू नये. त्याबरोबरच, या फोनच्या स्क्रीनमध्ये काही बिघाड असल्यास, बरेच लोक स्वतः स्क्रीन बदलण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कधीकधी डिव्हाइसमध्ये मोठी समस्या देखील उद्भवू शकते.
जर तुम्ही डिव्हाइसवर कोणतेही अनुचित सॉफ्टवेअर इंस्टॉल केले तर, यामुळे तुमच्या फोनची वॉरंटी रद्द होण्याची शक्यता असते. तसेच, यामुळे तुमचे डिव्हाइस देखील खराब होऊ शकते. त्यामुळे अयोग्य सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची चूक कधीही करू नका.