Smartphones Launched In March 2024: Nothing पासून ते Realme पर्यंत मार्च महिन्यात भारतात लाँच झाले ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News
Nothing Phone 2a फोन भारतीय बाजारात 5 मार्च रोजी लाँच करण्यात आला.
Realme Narzo 70 Pro 5G फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये
Lava O2 स्मार्टफोन या यादीतील बजेट रेंजमध्ये येणारा स्मार्टफोन आहे.
2024 चा मार्च महिना स्मार्टफोन जगतात अगदी महत्त्वाचा आणि सक्रिय ठरला आहे. या महिन्यात अनेक प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीचे बहुप्रतीक्षित Smartphones लाँच झाले आहेत. होय, मार्चमध्ये Nothing Phone 2a, iQOO Z9 5G आणि Realme Narzo 70 Pro 5G सारखे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात या महिन्यात लाँच झालेल्या अप्रतिम स्मार्टफोन्सची यादी-
Nothing Phone 2a
Nothing Phone 2a फोन भारतीय बाजारात 5 मार्च रोजी लाँच करण्यात आला. हा फोन 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला गेला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर, 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 32MP फ्रंट कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी आहे.
Samsung Galaxy M14 4G
Samsung Galaxy M14 4G फोन 6 मार्च रोजी भारतात लाँच झाला होता. Samsung Galaxy M14 4G फोनची सुरुवातीची किंमत 8,499 रुपये आहे. मुख्य तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर, 50MP प्राथमिक रीअर कॅमेरा सेटअप, 13MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
iQOO Z9 5G
iQOO Z9 5G फोन भारतात 12 मार्च रोजी लाँच झाला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर, 50MP प्राइमरी रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.
Realme Narzo 70 Pro 5G
Realme Narzo 70 Pro 5G फोन 19 मार्च रोजी भारतात लाँच झाला. या फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मुख्य सेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये HD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर, 50MP प्राइमरी रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल.
Lava O2
देशी कंपनीचा नवीनतम Lava O2 स्मार्टफोन भारतीय बाजारात फोन 22 मार्च रोजी लाँच झाला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. हा फोन या यादीतील बजेट रेंजमध्ये येणारा स्मार्टफोन आहे. यात 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले, UNISOC T616 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 50MP ड्युअल एआय रिअर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.
Tecno Pova 6 Pro 5G
अवघ्या दोन दिवसांपूर्वी Tecno ने त्यांचा नवा Tecno Pova 6 Pro 5G स्मार्टफोन 29 मार्च रोजी भारतात लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर, 108MP रिअर कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 70W फास्ट चार्जिंग स्पीड मिळणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile