Smartphones Launch Today: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo आणि Poco आपले लेटेस्ट स्मार्टफोन आज भारतात लाँच करणार आहेत. आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी Oppo Reno 13 सिरीज आणि POCO X7 सिरीज भारतात लाँच होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Oppo Reno 13 5G आणि Oppo Reno 13 Pro 5G स्मार्टफोन Oppo Reno 13 सिरीज अंतर्गत सादर केले जातील. त्याबरोबरच, POCO X7 आणि POCO X7 Pro हे फोन्स POCO X7 सिरीजमध्ये लाँच केले जातील. दोन्ही लाँच इव्हेंट लाईव्ह पाहता येणार आहे. जाणून घेऊयात सर्व तपशील-
लेटेस्ट Oppo Reno 13 सीरीज आज संध्याकाळी 5:00 वाजता लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या लाँच इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या YouTube चॅनेलवर पाहता येईल. ही सिरीज लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या सिरीजसाठी मायक्रो वेबसाइट देखील लाईव्ह करण्यात आली आहे.
साईटद्वारे पुष्टी झालेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo Reno 13 फोनमध्ये AI लाईव्ह फोटो सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. तर डस्ट आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP69 रेटिंग देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर देण्यात आला आहे. प्रो व्हेरिएंटमध्ये 80W SUPERVOOC फ्लॅश चार्ज सपोर्टसह 5800mAh बॅटरी आहे. हा फोन 50MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे.
लेटेस्ट POCO X7 सिरीज आज संध्याकाळी 5 वाजता लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या सिरीजअंतर्गत दोन POCO X7 आणि POCO X7 Pro हँडसेट सादर केले जातील. या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सिरीजमधील प्रो व्हेरिएंटची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. तर, कंपनी POCO X7 फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करेल, अशी अपेक्षा आहे.
स्पेक्सबद्दल बोलायचे झालास, प्रो व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8300 अल्ट्रा प्रोसेसर मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी 6,550mAh बॅटरी मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर मिळेल. याव्यतिरिक्त, स्टॅंडर्ड मॉडेल POCO X7 मध्ये AMOLED डिस्प्लेसह 50MP चा मुख्य कॅमेरा मिळणार आहे. मात्र, फोनचे कन्फर्म फीचर्स लाँच इव्हेंटमध्ये पुढे येतील.