New Smartphones Launch This Week: परवडणाऱ्या किमतीत जबरदस्त स्मार्टफोन्स भारतात होणार लाँच, पहा यादी

Updated on 16-Mar-2025
HIGHLIGHTS

या आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोनस

प्रसिद्ध ब्रँड्सचे अनेक स्मार्टफोन्स लाँच होण्यासाठी सज्ज

आगामी OPPO F29 सिरीज 20 मार्च रोजी भारतात दाखल होईल.

New Smartphones Launch This Week: मार्च महिना सुरु झाल्यापासून हा महिना लेटेस्ट स्मार्टफोनच्या नावावर झाला आहे. आता मार्च महिन्याच्या तिसरा आठवडा सुरु होत आहे, यासह अनेक स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध ब्रँड्सचे अनेक स्मार्टफोन्स लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. होय, Realme, Oppo चे मध्यम श्रेणीचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. या आठवड्यात भारतात येणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी पहा-

Also Read: दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह Vivo V30e 5G फोनवर भारी Discount, व्लॉगिंगसाठी Best पर्याय

Realme P3 Ultra

Realme P3 Ultra स्मार्टफोनची लाँच तारीख कन्फर्म झाली आहे. हा फोन भारतीय बाजारात 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. हा P सिरीजचा पहिला अल्ट्रा फोन असणार आहे, जो मध्यम श्रेणीमध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये उत्तम डिझाइन, परफॉर्मन्स आणि कॅमेरा फीचर्स असतील. या फोनची विक्री Flipkart वर उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देखील असेल, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी आणि 8MP सेकंडरी कॅमेरा असेल. फोनची किंमत आणि खरे फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Realme P3

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा आणखी एक स्मार्टफोन लाँच होणार आहे. होय, 19 मार्च रोजी आगामी Realme P3 स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. लाँचिंगपूर्वी त्याचे काही फीचर्सही समोर आले आहेत. या फोनमध्ये 18GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध असेल. या फोनमध्ये देखील वरील फोनप्रमाणे 6000mAh जंबो बॅटरी देखील दिली जाईल. यासह तुम्ही दीर्घकाळ बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकता.

OPPO F29 Series

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo आपला आगामी स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी OPPO F29 सिरीजची लाँच तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. ही सिरीज 20 मार्च रोजी भारतात दाखल होईल. कंपनी या सिरीजअंतर्गत Oppo F29 आणि Oppo F29 Pro हे दोन फोन देखील लाँच करणार आहे. या फोनचे फीचर्स अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, लीकनुसार, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर असेल. याशिवाय, या फोनची बॅटरी देखील 6000mAh असेल, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोनचे योग्य फीचर्स हा फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :