Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार भारी स्मार्टफोन्स, परवडणाऱ्या किमतीत मिळणार अप्रतिम पर्याय

Updated on 26-Aug-2024
HIGHLIGHTS

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील भारी स्मार्टफोन होणार लाँच

या काळात भारतात मिड बजेट स्मार्टफोन्स लाँच करण्यात येतील.

या आठवड्यात लेटेस्ट Vivo, Realme ब्रँड्सचे फोन होणार लाँच

Smartphones Launch This Week: ऑगस्ट महिन्यात भारतीय स्मार्टफोन बाजारात अनेक भारी स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने ऑगस्ट महिन्यात या काळात भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी आणि 1,00,000 रुपयांपेक्षा म्हणजेच बजेट ते एक्सपेन्सिव्ह श्रेणीत लाँच केले आहेत. आता ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. होय, 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अनेक स्मार्टफोन्स भारतात लाँच होणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: फोटोग्राफीसाठी iPhone 16 सिरीजमध्ये मिळेल अधिक चांगला कॅमेरा सेटअप, जाणून घ्या डिटेल्स

Vivo T3 Pro 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo T3, T3x आणि T3 Lite नंतर T3 Pro 5G हा या सिरीजमधील चौथा स्मार्टफोन असेल. हा फोन उद्या म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जाईल. हा फोन 18,999 रुपयांना लाँच होण्याची शक्यता आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा मोबाइल Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरवर दिला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, Vivo T3 Pro मध्ये 120Hz 3D वक्र AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP Sony IMX882 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. लाँचनंतर फोनचे संपूर्ण स्पेक्स उघड होतील.

Realme 13 5G

Realme 13 Pro सिरीजनंतर कंपनी आता भारतात आपले बेस ‘नंबर’ म्हणजेच Realme 13 5G मॉडेल सादर करणार आहे. हा फोन 29 ऑगस्ट रोजी भारतात लाँच करण्यात येईल. हा फोन 17,999 रुपयांना लाँच केला जाण्याची शक्यता आहे. परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek चिपसेटवर काम करेल. लीकवर विश्वास ठेवला तर, या मोबाईलमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP चा रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, 45W चार्जिंग आणि 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. लाँचनंतर फोनचे संपूर्ण स्पेक्स उघड होतील.

Realme 13 Plus 5G

वरील फोनप्रमाणे, Realme 13 Plus 5G फोन सीरीजचे मोठे मॉडेल असेल. हा फोन देखील 29 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. हा फोन देखील मिड बजेटमध्ये सादर केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन MediaTek Dimensity 7300-Energy वर लाँच केला जाईल. हा फोन पॉवरचा 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करेल. तर, Realme 13 Plus 5G मध्ये 50MP चा बॅक कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या लाँचनंतर फोनचे संपूर्ण स्पेक्स आणि निश्चित किंमत पुढे येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :