Smartphones Launch This Week: ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून अनेक स्मार्टफोन्स भारतीय बाजारात दाखल करण्यात आले आहेत. आता या महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झालेला असून, या आठवड्यात देखील अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. तुम्हाला या आठवड्यात लेटेस्ट बजेट ते महागडे स्मार्टफोन्स पाहायला मिळतील. या आठवड्यात बहुप्रतीक्षित Google Pixel 9 स्मार्टफोन सिरीजदेखील लाँच केली जाणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-
Also Read: iQOO Z9s सीरीज 21 ऑगस्ट रोजी भारतात होणार लाँच, आगामी स्मार्टफोन्समध्ये काय मिळेल विशेष?
Realme C63 5G स्मार्टफोन 12 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर केला जाईल. हा 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये असण्याची शक्यता आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये 8GB रॅम सह MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी तुम्हाला 32MP चा रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळू मिळू शकतो.
Google ची बहुप्रतीक्षित Google Pixel 9 सिरीज गुगल कंपनी 14 ऑगस्ट रोजी आपले नवीन Pixel फोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 13 ऑगस्टच्या रात्री या स्मार्टफोन सीरिजचे जागतिक बाजारात अनावरण केले जाईल आणि भारतीय वेळेनुसार लाँच टाइम 14 ऑगस्ट असेल. या सिरीजमध्ये Google Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro Fold लाँच करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती कंपनीने दिली आहे. त्याबरोबरच, कंपनी Google Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL देखील सादर करू शकते, असे देखील बोलले जात आहे.
Pixel 9 हे या सिरीजचे रेगुलर मॉडेल असणार आहे, या फोनची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Pixel 9 Tensor G4 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये मिळेल, ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश असू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मागील Pixel 8 देखील जवळपास याच किंमत श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला होता.
भारतात Google Pixel 9 Pro ची सुरुवातीची किंमत 95,999 रुपये असण्याची शक्यता आहे. या मॉडेलची मूळ किंमत गेल्या वर्षी लाँच झालेल्या Pixel 8 Pro पेक्षा कमी असेल, अशी अपेक्षा आहे. या मोबाईलमध्ये Tensor G4 प्रोसेसर देखील दिसेल. हा फोन जेमिनी AI ने सुसज्ज असेल. यात 6.3 इंच लांबीचा डिस्प्ले आणि 42MP सेल्फी कॅमेरा असू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
Pixel 9 Pro हे या मालिकेतील टॉप मॉडेल असणार आहे. नावावरून समजलेच असेल की, या फोनमध्ये मोठी स्क्रीन दिसेल. लीकनुसार, हा फोन जवळपास दीड लाख रुपयांच्या किमतीत लाँच केला जाईल. तर, रिपोर्ट्सनुसार यामध्ये 6.9-इंच लांबीचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सुरक्षेसाठी यामध्ये Tensor G4 सोबत Titan M2 चिप देखील दिसू शकते. तर, फोन 16GB रॅमवर लाँच केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 512 GB स्टोरेज दिले जाईल, अशी माहीत मिळाली आहे.
Google Pixel 9 Pro Fold या उपकरणासह कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला दुसरा फोल्डेबल फोन आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Pixel 9 Pro Fold मध्ये 6.3 इंच लांबीची कव्हर स्क्रीन असेल, जी फोन फोल्ड केल्यावर बाहेर राहील. फोन ओपन केल्यास दिसणारा मुख्य डिस्प्ले 8 इंच लांबीचा असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये Tensor G4 आणि Titan M2 चिपची पॉवर मिळू शकते, ज्यामध्ये Gemini AI देखील असेल. हा फोन जवळपास 1,89,999 रुपयांना लाँच केला जाऊ शकतो.