Smartphones Launch in November 2024: जबरदस्त स्मार्टफोन्स बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, पहा यादी
नोव्हेंबर महिन्यात अनेक बहुप्रतीक्षित स्मार्टफोन जागतिक आणि भारतीय बाजारात लाँच होणार
OPPO Find X8 सिरीज संबंधित इव्हेंट पेज लाईव्ह
iQOO 13 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञान सुसज्ज कॅमेरा सेटअप मिळेल.
Smartphones Launch in November 2024: ऑक्टोबर महिना स्मार्टफोन्सच्या नावावर झाला आहे. अनेक बहुप्रतीक्षित आणि टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन्स गेल्या भारतात लाँच झाले. यामध्ये एक्सपेन्सिव्ह ते बजेट रेंजचे स्मार्टफोन्स सामील आहेत. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर महिन्याला देखील सुरुवात झाली आहे. या महिन्यात देखील अनेक बहुप्रतीक्षित स्मार्टफोन जागतिक आणि भारतीय बाजारात लाँच केले जातील. यामध्ये Realme, IQOO इ. ब्रँड्सचे स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: बहुप्रतीक्षित OnePlus 13 फोन पॉवरफुल प्रोसेसरसह अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व विशेषता
OPPO Find X8 Series
Oppo Find X8 सिरीज नुकतेच चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. आता ही लाइनअप भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची तयारी आहे. यासंबंधित इव्हेंट पेजदेखील लाईव्ह करण्यात आले आहे. यावरून नोव्हेंबरमध्ये ही सिरीज सादर होण्याची, शक्यता आहे. मात्र, लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या सिरीजमधील उपकरणे Android 15 वर कार्य करतात. फोनमध्ये 6.59 इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi A4
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने आपला नवा आणि आगामी स्मार्टफोन Redmi A4 इंडियन मोबाईल काँग्रेस IMC 2024 मध्ये शोकेस केला होता. कंपनीने कन्फर्म केले आहे की, हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. भारतात या स्मार्टफोनची अपेक्षित किंमत 9000 रुपये इतकी आहे. या नव्या बजेट फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे. तसेच, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले दिला जाईल.
iQOO 13
iQOO 13 ची प्रतीक्षा बरेच दिवसांपासून सुरु आहे. नुकतेच हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होणे, अपेक्षित आहे. रिपोर्ट्स आणि लीक्स नुसार, पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 120W चार्जिंगसह 6,150mAh बॅटरीसह येऊ शकतो. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञान सुसज्ज कॅमेरा सेटअप प्रदान करू शकते. तसेच, iQOO 13 स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह लॉन्च केला जाईल, जो नोव्हेंबरमध्ये भारतात दाखल होईल.
Realme GT 7 Pro
Realme च्या नव्या आणि आगामी Realme GT 7 Pro फोनच्या लाँचची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. हा फोन चीनमध्ये 4 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हे उपकरण Snapdragon 8 Elite या लेटेस्ट प्रोसेसरसह येईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6,310mAh बॅटरी मिळू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी, हा फोन 50MP कॅमेराने सुसज्ज असेल. तसेच, यात 12GB रॅम दिली जाऊ शकते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile