Smartphone Photography Tips: स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी करण्यासाठी विशेष टिप्स, मिळेल आकर्षक फोटो

Updated on 26-Mar-2025
HIGHLIGHTS

आजकाल स्मार्टफोनमधील कॅमेरा ऍडव्हान्स फीचर्ससह येतात.

फोनचा कॅमेरा चांगला असेल तरी प्रत्येकाला याद्वारे आकर्षक फोटोग्राफी करता येईल, असे नाही.

आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या कॅमेरा फोटोग्राफी संबंधित काही उपयुक्त टिप्स देणार आहोत.

Smartphone Photography Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजकाल स्मार्टफोनचा कॅमेरा इतका ऍडव्हान्स झाला आहे की, फोटोग्राफीसाठी महागडे कॅमेरे आणि ऍक्सेसरीज वापरण्याची अजिबात गरज पडत नाही. सध्या हँडसेटमध्ये अनेक फीचर्स येतात, जे वापरून सर्वोत्तम फोटोग्राफी करता येते. पण, फोनसह चांगला कॅमेरा असला तरीही, प्रत्येकाला याद्वारे आकर्षक फोटोग्राफी करता येईल, असे नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास कॅमेऱ्याची कार्यक्षमता सुधारेल.

Also Read: Realme P3 5G ची सेल आजपासून होणार सुरु! स्वस्त फोनवर थेट 2000 रुपयांची सूट, पहा किंमत

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याशी संबंधित काही उपयुक्त टिप्स देणार आहोत, ज्यामुळे कॅमेऱ्याची क्षमता सुधारेल आणि फोटोज क्लियर होतील. पहा विशेष टिप्स-

बिल्ट-इन फीचर्स

स्मार्टफोनमधील बिल्ट इन फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आजकाल बहुतेक स्मार्टफोन्समध्ये नाईट, पोर्ट्रेट, नाईट आणि HDR सारखे कॅमेरा फीचर्स येतात. फोटो काढताना फोनमधील या कॅमेरा फिचर्सचा वापर नक्की करावा. याच्या मदतीने तुम्ही केवळ दिवसाच नाही तर, रात्री देखील चांगले फोटो काढण्यास सक्षम असाल.

कॅमेरा सेटिंग्ज

फोनच्या कॅमेऱ्यामध्ये उपलब्ध असलेले OIS, फोकस आणि एक्सपोजर ऍडजस्ट करून फोटो क्लिक करा. याद्वारे तुमचे फोटो आणखी क्लियर आणि रंग चांगले दिसतील. यामुळे फोटोमधील गोंधळ देखील कमी होईल.

लाइटिंग

लाईटिंग हा फोटोग्राफीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला माहितीच असेल की, नैसर्गिक प्रकाशात चांगले फोटो येतात. नेहमी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी फोटोग्राफी करा. यामुळे फोटोमध्ये चांगले रंग आणि चांगला टोन देखील येईल. तसेच, वस्तू देखील स्पष्टपणे कॅप्चर होतील. यासह, तुम्हाला फोटोग्राफीसाठी अतिरिक्त ऍक्सेसरीज आणि फीचर्स वापरण्याची आवश्यकता नाही.

लेन्स क्लियर करा.

क्लियर फोटोसाठी स्मार्टफोन लेन्स स्वच्छ करणे, खूप महत्वाचे आहे. ही एक छोटी पण महत्त्वाची टीप नेहमी लक्षात ठेवा. म्हणून, वेळोवेळी फोनचा कॅमेरा मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे लेन्सवर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ होईल.

युनिक अँगल

युनिक अँगलमधून काढलेले फोटोज नेहमीच छान दिसतात. जेव्हा जेव्हा तुम्ही फोटो काढायला जाता तेव्हा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्याचे प्रयत्न करा. एकदा का युनिक अँगल सेट झाले की, हे तुमच्या फोटोला आकर्षक परिणाम देईल, ज्यामुळे तुमची फोटो आणखी आकर्षक होणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :