स्मार्टफोन चार्ज करतानाही ‘ही’ चूक करू नका, अन्यथा पडेल महागात…
स्मार्टफोन चार्ज होत असताना वापरल्यास काय होईल ?
व्हिडिओ शूटिंगचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोनच्या मदरबोर्डवर होतो.
गेमिंग दरम्यान स्मार्टफोन जास्तीत जास्त हिट होतो.
स्मार्टफोन चार्ज करताना तुम्हाला अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही असे न केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अगदी तुमचा स्मार्टफोन कायमच बंद पडू शकतो. यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करता तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
हे सुद्धा वाचा : Poco X5 Proची लाँच डेट कन्फर्म! 'या' दिवशी होणार भारतात दाखल
स्मार्टफोन चार्ज होत असताना वापर केल्यास काय होईल?
तुमचा स्मार्टफोन चार्ज होत असताना वापरणे टाळावे. असे केल्याने तुमच्या स्मार्टफोनच्या मदरबोर्डवर ताण येतो. जर तुम्ही दररोज असे केले तर स्मार्टफोन देखील कायमचा बंद होऊ शकतो. चार्जिंग करताना नेहमी स्मार्टफोनचा वापर करू नये. जेव्हाही स्मार्टफोन चार्ज केला जातो तेव्हा त्याचे कनेक्शन स्मार्टफोनच्या मदरबोर्डशी केले जाते.
व्हिडिओ शूट करणे.
फोन चार्ज करत असताना वापरण्यापेक्षा जास्त व्हिडिओ शूट करणे, तुमच्या फोनचे नुकसान करू शकते. त्याचा प्रभाव तुमच्या फोनच्या प्रोसेसरवरही दिसून येतो. फोनवरून सतत व्हिडिओ शूट केल्याने तो गरम होऊ लागतो. अशा स्थितीत, जेव्हाही तुम्ही शूट कराल तेव्हा स्मार्टफोनला काही वेळ आराम द्यावा. व्हिडिओ शूटिंगचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोनच्या मदरबोर्डवर होतो. म्हणूनच आपण नेहमी त्याची काळजी घेतली पाहिजे.
गेमिंग करणे.
साधारणपणे फोनच्या प्रोसेसरवर अधिक प्रेशर टाकला जातो. हे गेमिंग दरम्यान अधिक दिसून येते. गेमिंगमुळे फोनच्या प्रोसेसरवर सर्वाधिक ताण येतो. गेमिंग करताना तुम्ही फोन चार्ज अजिबात करू नये किंवा फोन चार्ज करताना गेमिंग करू नये. गेमिंग दरम्यान स्मार्टफोन जास्तीत जास्त हिट होतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile