Smartphone Buying Tips: नवीन फोन खरेदी करताय? Best ऑप्शनसाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी। Tech News  

Smartphone Buying Tips: नवीन फोन खरेदी करताय? Best ऑप्शनसाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी। Tech News  
HIGHLIGHTS

Amazon किंवा Flipkart सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करायचंय?

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

5G चे युग सुरु झाल्यापासून 5G ​​कनेक्टिव्हिटीचा फोन असणे आवश्यक

जर तुम्ही Amazon किंवा Flipkart सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन Tips देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करता येईल.

5G कनेक्टिव्हिटी

सर्वप्रथम आपण फोनमधील 5G ​​कनेक्टिव्हिटीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण Jio आणि Airtel या दोघांनीही देशातील बहुतांश भागात 5G सेवा सुरू केली आहे. जर तुम्हाला या उत्तम सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नव्या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी असण्याची आवश्यकता आहे.

स्क्रीन साईज

स्मार्टफोन 6 इंच ते 6.5 इंच लांबीपर्यंत कॉम्पॅक्ट आकारात विकत घ्यावा. तसेच स्क्रीन ब्राइटनेस आणि स्क्रीन साईजदेखील महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच, फोनने किमान 90 ते 120Hz रिफ्रेश रेटला समर्थन दिले पाहिजे. AMOLED डिस्प्ले 30 हजार रुपयांच्या किंमतीत अधिक चांगला मानला जातो.

smartphone tips
smartphone tips

प्रोसेसर आणि स्टोरेज

कोणत्याही स्मार्टफोनसाठी प्रोसेसर महत्त्वाचा असतो. नेहमी चांगल्या गुणवत्तेचा प्रोसेसर असलेले फोन खरेदी केले पाहिजेत. कारण प्रोसेसर चांगला नसेल, तर कितीही कॅमेरे आणि मेगापिक्सेल असले तरी त्याचा अंतिम परिणाम हा चांगला येत नाही. यामध्ये Qualcomm, MediaTek आणि Exynos यांची नावे प्रसिद्ध आहेत. फोनमध्ये किमान 6GB ते 8GB RAM असावी आणि स्टोरेजसाठी 128GB आणि 256GB पर्यंत असणे, आवश्यक आहे.

कॅमेरा

एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा म्हणजे सर्वप्रथम आपल्याला त्याच्या कॅमेराने आकर्षित करायला हवं. फोनमधील मेगापिक्सल आणि कॅमेरा सोबतच सेन्सरचा आकार, रिझोल्यूशन आणि अपर्चर तपासणे आवश्यक आहे. अन्यथा जास्त मेगापिक्सेल असूनही अंतिम परिणाम म्हणजे फोटो चांगले येत नाही.

बॅटरी

फोनमध्ये 4500mAh ते 5000mAh ची बॅटरी योग्य ठरते. जास्त mAh असलेले बॅटरी फोन खूप हेवी होतात. बॅटरीऐवजी जलद चार्जिंगकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आज 66W पर्यंत जलद चार्जिंग फोन उपलब्ध आहेत, जे 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo