7 हजार रुपयांअंतर्गत स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?

7 हजार रुपयांअंतर्गत स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?
HIGHLIGHTS

असा स्मार्टफोन निवडा जो सुमारे 64GB स्टोरेज देईल.

10 हजार रुपयांच्या अंतर्गत सर्व फोन्समध्ये जवळपास एकच डिझाईन मिळते.

फोनचे डिस्प्ले पॅनल चांगले असणे आवश्यक आहे.

2023 मध्ये 7 हजारांच्या किंमतीच्या आत स्मार्टफोन निवडणे कठीण काम असू शकते. कारण तुमच्यासाठी बाजारात एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन घ्यावा. 7,000 रुपये किमतीचा स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची तुम्ही सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

स्टोरेज 

 या किमतीत बहुतेक स्मार्टफोन उत्पादक तुम्हाला कमी स्टोरेज देतात, तुम्हाला जास्तीत जास्त 32GB स्टोरेज मिळते. मात्र, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि असा स्मार्टफोन निवडा जो सुमारे 64GB स्टोरेज देईल.

डिझाईन 

 10 हजार रुपयांच्या अंतर्गत सर्व फोन्समध्ये जवळपास एकच डिझाईन मिळते. परंतु आजकाल सर्व स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे स्मार्टफोन वेगवेगळ्या डिझाइनमध्ये लाँच करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून एखाद्या आकर्षक डिझाईनचा स्मार्टफोन निवडा. 

परफॉर्मन्स 

कमी किंमतीत येणाऱ्या फोनमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळत नाही. म्हणूनच उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही चांगला प्रोसेसर असलेला फोन निवडावा.

डिस्प्ले 

फोनचे डिस्प्ले पॅनल चांगले असणे आवश्यक आहे, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की तेजस्वी सूर्यप्रकाशात तो काळा होणार नाही.

बॅटरी 

खरं तर तुम्ही मोठी बॅटरी असलेला फोन घ्यावा.कारण जर तुम्हाला फोन पूर्ण दिवस वापरायचा असेल, तर तुम्ही 4000-5000mAh बॅटरीसह येणारा फोन निवडा.

कॅमेरा 

शेवटची गोष्ट तुम्ही हे देखील लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही खरेदी करत असलेल्या फोनमध्ये चांगला कॅमेरा देखील असावा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo