फुल स्क्रीन डिस्प्ले सह Sharp AQUOS Sense Plus झाला लॉन्च
Sharp AQUOS Sense Plus स्मार्टफोन ने मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये लॉन्च झालेल्या Sharp AQUOS Sense ची जागा घेतली आहे.
Sharp ने बुधवारी जापान मध्ये आपला फ्लॅगशिप डिवाइस AQUOS R2 लॉन्च केला होता पण फ्लॅगशिप डिवाइस व्यतिरिक्त कंपनी ने AQUOS Sense Plus स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे.
Sharp AQUOS Sense Plus स्मार्टफोन ने मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये लॉन्च झालेल्या Sharp AQUOS Sense ची जागा घेतली आहे. AQUOS Sense एक एंट्री-लेवल मॉडेल होता पण Sense Plus एक मिड-रेंज सेगमेंट डिवाइस च्या रुपात सादर करण्यात आला आहे. AQUOS Sense Plus मध्ये 5.5 इंचाचा IGZO डिस्प्ले आहे जो एक फुल HD+ डिस्प्ले आहे आणि याचे रेजोल्यूशन 2160 × 1080 पिक्सल आणि एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. या स्मार्टफोन च्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच नाही. डिवाइस च्या फ्रंटला होम बटन आहे जो कदाचीत फिंगरप्रिंट रीडर पण असू शकतो.
या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज वाढवता येते. AQUOS Sense Plus च्या टॉपला डावीकडे सिंगल रियर कॅमेरा आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक LED फ्लॅश देण्यात आला आहे.
Sharp AQUOS Sense Plus स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, हा डिवाइस वाइट आणि गोल्ड रंगांमध्ये विकत घेता येईल. अजूनतरी या डिवाइस ची किंमत आणि उपलब्धता याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
कंपनी च्या फ्लॅगशिप डिवाइस AQUOS R2 बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 6.0 इंचाचा IGZO डिस्प्ले देण्यात आला आहे जो WQHD+ के 1440 x 3040 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो आणि याच्या डिस्प्ले चा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे
नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे.