Samsung लवकरच भारतीय बाजारात Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. आता सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर, आगामी Samsung Galaxy A13 5G चे सपोर्ट पेजदेखील दाखवण्यात आले आहे. डिसेंबर 2021मध्ये Galaxy A13 5G ने अमेरिका मार्केटमध्ये जागतिक पदार्पण केले. अलीकडेच, Galaxy A13 5G ची युरोपियन आवृत्ती Google Play Console डेटाबेसवर दिसली. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवरील Galaxy A13चा सपोर्ट पेज पुष्टी करतो की हँडसेटच्या भारतीय व्हेरिएंटचा मॉडेल क्रमांक SM-A136B असेल, जो युरोपियन व्हेरिएंटसारखाच असणार आहे.
डिव्हाइसमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. हे उपकरण ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आणि माली G57 GPU सह जोडलेले आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वात स्वस्त प्लॅन्स! 14GB डेटा, फ्री कॉलिंग आणि SMSसह बरेच काही, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी
Samsung Galaxy A13 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळत आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देखील समाविष्ट आहे. त्याबरोबरच, यासह LED फ्लॅशदेखील आहे. याशिवाय, आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 5MP कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Samsung Galaxy A13 5G मध्ये 5,000mAh बॅटरी मिळत आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइसला चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळत आहे. या फोनमध्ये पॉवर बटणच्या आत एम्बेड केलेला साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल.
Galaxy A13 5G च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत $250 म्हणजेच सुमारे 19,400 रुपये आहे. तसेच एका अहवालानुसार, 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये 209 युरो म्हणजेच अंदाजे 17,400 रुपये असेल. त्याच प्रमाणे, हँडसेटच्या 4GB + 128GB वेरिएंटची किंमत 239 युरो म्हणजेच अंदाजे 19,900 रुपये असणार असल्याचे सांगितले जात आहे.