सॅमसंगने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये Z3 स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने ह्या स्मार्टफोनचा एक नवीन व्हर्जन लाँच केला आहे. ह्या नवीन व्हर्जनला Z3 कॉर्पोरेट एडिशन असे नाव दिले आहे. सध्यातरी हा व्हर्जन रुसमध्ये उपलब्ध आहे.
Z3 कॉर्पोरेट एडिशन आपल्या जुन्या व्हर्जनपेक्षा खूपच वेगळा आहे. भारतात सॅमसंग Z3 सुद्धा ह्या नवीन व्हर्जनपेक्षा खूप वेगळा आहे. Z3 कॉर्पोरेट एडिशनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन MSM8916 (SD410) चिपसेट देण्यात आली आहे. ह्यात 4G LTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. तर जुन्या Z3 स्मार्टफोन 3G सपोर्ट देण्यात आला आहे आणि ह्याचे चिपसेटसुद्धा वेगळे आहेत.
हेदेखील पाहा – फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी
सॅमसंगचे ऑफिशियल पार्टनर लिनक्स सेंटर स्टोर रुसमध्ये Z3 कॉर्पोरेट एडिशन विकत आहे. ह्या फोनची किंमत RUB 16,618 (जवळपास $260) आहे.
हेदेखील वाचा – शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर