Samsung चा नवीन Galaxy On फोन इनफिनिटी डिस्प्ले सह पुढील आठवड्यात केला जाऊ शकतो लॉन्च

Updated on 28-Jun-2018
HIGHLIGHTS

Samsung च्या या नवीन Galaxy On स्मार्टफोन मध्ये एका रिपोर्ट नुसार इनफिनिटी सुपर AMOLED डिस्प्ले असणार आहे, तसेच यात तुम्हाला 4GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळेल.

Samsung to Launch a New Galaxy on Smartphone with Infinity Display: Xiaomi आणि Samsung भारतीय बाजारात सर्वात वर प्रतिस्पर्धा करत आहेत, असे पण म्हणू शकतो की भारतीय बाजारात या दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर चालू आहे, या दोघांमध्ये ही टक्कर नंबर एक चे स्थान मिळण्याची आहे. सॅमसंग ने काही काळापासून भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपन्या जसे की माइक्रोमॅक्स ला मागे टाकत स्वतःला पुन्हा एकदा भारतीय बाजारात पुढे आणले आहे. पण Xiaomi भारतीय बाजारात आल्यामुळे मोठे बदल झाले आहेत. फक्त तिन वर्षांच्या कमी काळात Xiaomi ने सॅमसंग ला मागे टाकले आहे आणि हा भारतात एक आवडीचा मोठा ब्रँड म्हणून समोर आला आहे. 

पण अजून प्रीमियम बाजारापासून Xiaomi खुप दूर आहे, या सेगमेंट मध्ये कंपनीला स्वतः ला सिद्ध करण्यात खुप अडचणी येत आहेत. या सेगमेंट मध्ये अॅप्पल, सॅमसंग, OnePlus ने मोठे यश मिळवले आहे. याबाबतीत Xiaomi जरी मागे असली तरी बजेट आणि मिड-रेंज सेगमेंट मध्ये कंपनी ने आपली चांगली पकड बनवली आहे. 

सॅमसंग ही गोष्ट नाकारू शकत नाही. यासाठी सॅमसंग मागच्या खुप काळापासून आपल्या बजेट सेगमेंट चा पोर्टफोलियो सुधारण्याचे प्रयत्न करत आहे. सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी भारतात आपला सॅमसंग गॅलेक्सी On7 Prime पण बजेट किंमतीत लॉन्च केला होता. पण त्यात काही जास्त यश आले नाही. त्यानंतर कंपनी ने भारतीय बाजारात आपला Samsung Galaxy J7 Duo स्मार्टफोन लॉन्च केला होता, त्यालाही विशेष यश मिळाले नाही. 

त्या नंतर बातम्या येत होत्या की कंपनी आता आपल्या स्मार्टफोंसना इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च करेल, हा सिलसिला मे पासून सुरू झाला होता, कंपनी ने आपले सॅमसंग गॅलेक्सी A6, Galaxy A6+, Galaxy J6 आणि Galaxy J8 स्मार्टफोंस भारतीय बाजारात सादर केले आहेत. हे कंपनी चे पहिले असे मिड-रेंज स्मार्टफोंस आहेत जे इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आले आहेत. 

पण आता बातमी येत आहे की कंपनी आपला एक नवीन स्मार्टफोन Galaxy On सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हा डिवाइस पण इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस जुलै मध्ये लॉन्च होणार आहे. असे बोलले जात आहे की हा स्मार्टफोन एका Super AMOLED सह लॉन्च केला जाऊ शकतो, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 4GB च्या रॅम सह 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळू शकते. हा डिवाइस एक्सीनोस चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :