“Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स

Updated on 02-May-2016
HIGHLIGHTS

कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने अशी घोषणा केली आहे की, तो आपल्या स्मार्टफोन्सवर“Make for India” च्या अंतर्गत आकर्षक सूट देणार आहे.

कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने अशी घोषणा केली आहे की, तो आपल्या स्मार्टफोन्सवर“Make for India” च्या अंतर्गत आकर्षक सूट देणार आहे. हा डिस्काउंट १५ मे पर्यंत मिळणार आहे. ह्या सेलच्या अंतर्गत सॅमसंगचे काही निवडक स्मार्टफोन्स आपल्याला केवळ १ रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय आपल्याला शिल्लक रक्कम EMI द्वारे देण्याची आकर्षक ऑफर दिली जात आहे. ह्याचाच अर्थ सॅमसंगचे काही निवडक स्मार्टफोन्स आपण केवळ १ रुपयात घेऊ शकता. त्यानंतर उरलेले पैसे आपल्याला भरायचे आहेत. मात्र सुरुवातीला केवळ १ रुपयाच द्यावा लागणार आहे. जास्त माहितीसाठी आपण ह्या वेबसाइटवर जाऊ शकता. सॅमसंग गॅलेक्सी S6 आणि गॅलेक्सी नोट 5 वरसुद्धा ही ऑफर मिळत आहे.
 

ह्या सेलमध्ये आपल्याला गॅलेक्सी A7 मिळत आहे, ज्याची किंमत आहे २९,९९० रुपये. तसेच गॅलेक्सी A5 सुद्धा आपल्याला ह्या सेलअंतर्गत मिळत आहे, ज्याची किंमत आहे २४,९०० रुपये. ह्या सेलमध्ये गॅलेक्सी ग्रँड प्राइम 4G स्मार्टफोनसुद्धा घेऊ शकता, जो आपल्याला ८,२५० रुपयात मिळत आहे.

सविस्तर माहितीसाठी अथवा डिल्ससाठी येथे क्लिक करा.

ह्या सेलमध्ये ह्या स्मार्टफोन्सशिवाय सॅमसंगचा UHD TV आणि FHD कर्व्ह्ड स्मार्ट टिव्हीसुद्धा घेऊ शकता, ज्यात आपल्याला कॅशबॅकसुद्धा मिळत आहे. तसेच EMI पर्यायासह फ्री वॉरंटीसुद्धा मिळत आहे. त्याशिवाय सॅमसंग आपल्याला HD DTH वरसुद्धा ऑफर देत आहे. त्याशिवाय जे लोक फ्रीज घेऊ इच्छितात, त्यांना हा एक्सचेंज स्कीमच्या अंतर्गत मिळू शकतो.

 

हेदेखील वाचा – केवळ १ दिवसात ह्या स्मार्टफोनचे झाले ४.५ मिलियन रेकॉर्ड प्री-रजिस्ट्रेशन
हेदेखील वाचा – 
एअरटेलच्या नवीन आंतरराष्ट्रीय पॅकमध्ये मिळत आहे मोफत कॉल्स आणि डाटा

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :