ह्या अपडेटमध्ये फर्मवेयर व्हर्जन G900IDVU1ANE1 याचा समावेश केला आहे. त्याचबरोबर हा मार्शमॅलोसह येणा-या फीचर्सने सुसज्ज आहे.
मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी S5 साठी अॅनड्रॉईड मार्शमॅलो v6.0.1 चे अपडेट जारी केले आहे. सॅममोबाईलच्या रिपोर्ट नुसार, ह्या अपडेटमध्ये फर्मवेअर व्हर्जन G900IDVU1ANE1 याचा समावेश केला आहे. त्याचबरोबर हा मार्शमॅलोसह येणा-या फीचर्सने सुसज्ज आहे. आशा आहे की लवकरच सर्व यूजर्सना हे नवीन अपडेट मिळेल. तसे यूजर्स स्वत: आपल्या फोनच्या सेटिंग मेनूमध्ये जाऊन हा नवीन अपडेट तपासून पाहू शकतात. (Setting>About Device>Software Update.)
सॅमसंगने २०१४ मध्ये गॅलेक्सी S5 लाँच केला होता आणि सुरुवातीला हा अॅनड्रॉईड किटकॅट v4.4.2 चालत होता. हा डिवाइस 5.1 इंचाच्या पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्लेने सुसज्ज आहे, जो IP67 प्रमाणित आहे. ह्याचाच अर्थ हा वॉटर रेजिस्टंस आहे. ह्या फोनशिवाय सॅमसंगने गॅलेक्सी S6 आणि S6 एजसाठी मार्शमॅलोचे अपडेट करण्याविषयी सांगितले होते.