Samsung Galaxy F13 आज 22 जून रोजी भारतात लाँच होणार आहे. ऑनलाइन लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर दुपारी 12 वाजता सुरू होईल. कंपनीने आधीच पुष्टी केली आहे की, आगामी स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तर लाँचपूर्वी, जाणून घेऊयात फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती…
Samsung Galaxy F13 ची भारतात अपेक्षित किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी F13 ची किंमत अद्याप उघड झालेली नाही. परंतु अफवा आणि लीक सूचित करतात की फोनची किंमत सुमारे 12,000 रुपये असेल.
कंपनीने पुष्टी केली आहे की, Samsung Galaxy F13 मध्ये 6.6 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले असेल. स्क्रीनमध्ये एक नॉच देखील असेल. तसेच, Samsung Galaxy F13 बॉक्समध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची बॅटरी आहे.
दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन निर्मात्याने पुष्टी केली की Samsung Galaxy F13 मध्ये 8GB पर्यंत RAM असेल आणि त्यात एक्सपेंडेबल RAM फिचर देखील असेल. हे डिव्हाइसला स्मूथ परफॉर्मन्स प्रदान करण्यात मदत करेल.
Samsung Galaxy F13 हा ऑटो डेटा स्विचिंग फीचर ऑफर करणारा सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे. याचा मुळात अर्थ असा की, जर एक सिम नीट काम करत नसेल, तर नेटवर्कची पर्वा न करता डेटा ऍटोमॅटिकली सेकंडरी सिममधून काम करण्यास सुरुवात करेल. स्मार्टफोन पिंक, ग्रीन आणि ब्लु कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.