2017 च्या सुरुवातीला सॅमसंग बाजारात आपले काही वाकणारी स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स आणू शकतो. ब्लूमबर्गच्या बातमीनंतर ह्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. त्याचबरोबर रिपोर्टनुसार, त्यातील एक स्मार्टफोन तर असा असणार आहे, जो पुर्णपणे फोल्ड होईल. ह्या फोनमध्ये 5 इंचाची डिस्प्ले असेल, जी मोठी होऊन एक टॅबलेटचे रुप घेते. आणि ह्याच्या स्क्रीनचा आकार जवळपास ८ इंचाचा असेल. एका रिपोर्टनुसार, हा फोन फेब्रुवारीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग ह्या फोन्सला गॅलेक्सी S सीरिजच्या नावाने बाजारात आणणार नाही. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या सीरिजमध्ये हे स्मार्टफोन्स आणले जातील हे सांगणे जरा अवघडच आहे.
हेदेखील पाहा – झोलो वन HD रिव्ह्यू
ही बातमी काही दिवसांआधी समोर आली होती आणि आता ब्लूमबर्गच्या रिपोर्टने ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. मागील महिन्यात अशी बातमी आली होती, की सॅमसंग पुढील वर्षी आपल्या पाच फ्लॅगशिप स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे. आणि ह्यात हे फोल्डेबल फोन्सचा सुद्धा समावेश आहे. ज्यांना गॅलेक्सी X सीरिजच्या नावाने बाजारात उतरले जाईल. ह्या डिवाइसमध्ये 4K रिझोल्युशन असलेली डिस्प्ले असू शकते. काही दिवसांपूर्वी ह्या संदर्भात कोरियाच्या एका वेबसाइठ ETNews ने एक बातमी प्रकाशित केली होती, ज्यात असे म्हटले होते की, सॅमसंग 2016 च्या शेवटपर्यंत आपले फोल्डेबल फोन्स लाँच करु शकते आणि आता २०१७ पर्यंत हे स्मार्टफोन्स बाजारात येतील असे सांगण्यात येतय. ह्या रिपोर्टमध्ये असेही सांगितले गेले आहे की, हा फोन 5 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात आणला जाईल. ह्या स्मार्टफोनला उघडताच हा ७ इंचाच्या टॅबलेट इतका होईल.
हेदेखील वाचा – ऑनर 4X स्मार्टफोनला भारतात अॅनड्रॉईड मार्शमॅलो अपडेट मिळणे सुरु
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध मोटो G4 प्लसमध्ये कोण आहे सरस?