Samsung Galaxy Note 10 चे चार मॉडेल्स होऊ शकतात लॉन्च

Samsung Galaxy Note 10 चे चार मॉडेल्स होऊ शकतात लॉन्च

Samsung ने या वर्षी आपल्या Galaxy S-सीरीज मध्ये चार डिवाइसेज लॉन्च केले आहेत जे Galaxy S10e, Galaxy S10, Galaxy S10+ आणि Galaxy S10 5G आहेत. रिपोर्ट नुसार, आता कंपनी Galaxy Note सीरीज मध्ये पण काही स्मार्टफोन्स सादर करू शकते. ETNews च्या रिपोर्ट नुसार कंपनी यावर्षी दोन Note डिवाइसेज 4G LTE सपोर्ट सह लॉन्च करेल तसेच दोन डिवाइसेज 5G मॉडेल्सच्या स्वरूपात येतील. 

रिपोर्ट मधून समोर आले आहे की छोट्या Galaxy Note 10 मध्ये 6.28 इंचाचा डिस्प्ले मिळेल तर मोठा मॉडेल 6.7 इंचाच्या डिस्प्ले सह येईल. दोन 4G मॉडेल्स 6.28 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केले जातील आणि 5G मॉडेल्स मोठ्या डिस्प्ले सह येतील. अशी पण बातमी येत आहे की मोठा मॉडेल चार रियर कॅमेर्‍यासह येतील तर छोट्या वेरिएंट मध्ये तीन कॅमेरा असतिल. या फोन्स मध्ये महत्वचा फरक मोबाईल नेटवर्कचा आहे. 

दरम्यान Samsung ने आपली Galaxy J आणि Galaxy A सीरीज एकत्र केली आहे. एका रिपोर्ट मधून समोर आले होते की सॅमसंग ने Galaxy J, On आणि C सीरीज एकत्र करून Galaxy M सीरीज बनवली आहे. 

सॅमसंग 10 एप्रिलला आपला लॉन्च इवेंट आयोजित करणार आहे ज्यात Galaxy A सीरीजचे तीन फोन्स लॉन्च केले जातील ज्यात Galaxy A90 चा पण समावेश आहे. Galaxy A90 स्लाइडिंग आणि रोटेटिंग कॅमेरा मॅकेनिज्म सह येऊ शकतो. रिपोर्टनुसार, या फोन मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल असेल. असे पण बोलले जात आहे की फोन साउंड-ऑन-डिस्प्ले टेक्नॉलॉजी सह येईल ज्याचा अर्थ असा की फोनच्या डिस्प्ले मधून साउंड येईल. 

Samsung Galaxy A90 ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7150 प्रोसेसर सह येईल आणि कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर फोन मध्ये तीन कॅमेरा दिले जातील ज्यात एक 48MP चा प्राइमरी कॅमेरा असेल ज्याचा अपर्चर f/2.0 असेल, तसेच दुसरा सेंसर 8MP चा असेल जो f/2.4 अपर्चर लेंस सह येईल आणि तिसरा ToF सेंसर असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo