मोठ्या डिस्प्लेसह लाँच होणार सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स?
ट्विटरवर ह्या फोनचा एक फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोमध्ये ह्या फोनचा केवळ वरचाच भाग दिसत आहे.
हाती आलेल्या बातमीनुसार, सॅमसंग त्याच्या सर्वात मोठी डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती मिळत आहे. ह्या नवीन फोनचे नवा गॅलेक्सी J मॅक्स असू शकते. ट्विटरवर ह्या फोनचा एक फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोमध्ये ह्या फोनचा केवळ वरचाच भाग दिसत आहे.
ह्या फोटोमध्ये ह्या फोनचा कॅमेरा, फ्लॅश आणि स्पीकर दिसत आहे. ह्या फोनची फ्रेम खूपच मोठी असल्याचेही ह्यात दिसत आहे. हा फोन 7 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज असेल.
Self-explanatory. pic.twitter.com/BeLHQnifb0
— Evan Blass (@evleaks) July 6, 2016
ह्याआधी शाओमीने अलीकडेच बाजारात Mi मॅक्स स्मार्टफोन लाँच केला. हा फोन 6.44 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. भारतात हा डिवाइस दोन व्हर्जनमध्ये लाँच केला आहे. स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर आणि 3GB रॅमसह तर दुसरा व्हर्जन आहे स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 4GB रॅमसह. ह्याची किंमत आहे अनुक्रमे १४,९९९ रुपये आणि १९,९९९ रुपये.
हेदेखील वाचा – केवळ २,९९९ रुपयात मिळतोय रिलायन्स 4G फोन आणि तेही ३ महिन्याच्या अनलिमिटेड डाटासह
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile