बरेचदा आपण फोन दुरुस्तीसाठी दुकानात देण्याचे टाळतो. तुमचा फोन दुरुस्त करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी सेवा केंद्रात नेणे सामान्यतः एक मोठा धोका असतो. काहीवेळा तुमचा फोन फक्त दुरुस्ती किंवा अपडेट दरम्यान फक्त रीसेट होत नाही तर तुमचा वैयक्तिक डेटा देखील धोक्यात असतो. मात्र, जर तुम्ही Samsung यूजर असाल तर आता तुम्हाला या चिंतेपासून मुक्ती मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा : जय श्री राम ! बॉक्स ऑफिसवर Ram Setuचे रेकॉर्ड ब्रेकिंग सुरु, 2022 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनर
सॅमसंगने आपल्या स्मार्टफोन उपकरणांसाठी एक नवीन फिचर जाहीर केले आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन सेवा केंद्राला दिल्यावरही सुरक्षित ठेऊ शकता. कंपनीने या फीचरला 'मेंटेनन्स मोड' असे नाव दिले आहे. हे फीचर प्रथम One UI 5 बीटा टेस्टींगसाठी प्रसिद्ध करण्यात आले होते, परंतु आता ते जागतिक स्तरावर सादर केले गेले आहे.
Samsung च्या मते, मेंटेनन्स मोड तुमचा फोन एका सुरक्षित स्थितीत ठेवतो. या फीचरच्या मदतीने यूजर्सना त्यांची वैयक्तिक माहिती जसे की फोटो, मेसेज आणि कॉन्टॅक्ट सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळते. म्हणजेच आता यूजर्स आपला फोन रिपेअरिंगसाठी सर्व्हिस सेंटरला कोणतीही काळजी न बाळगता देऊ शकतात. खरं तर, या मोडमध्ये, वापरकर्त्यांचे एक वेगळे प्रोफाइल तयार केले जाते, ज्यामध्ये वापरकर्त्यांचा आवश्यक डेटा म्हणजे फोटो, मॅसेज आणि काँटॅक्ट्स सेव्ह केले जातात.
म्हणजेच डेटामध्ये प्रवेश न करता दुरुस्तीचे काम सर्व्हिस सेंटरद्वारे केले जाऊ शकते. कंपनीने सांगितले की, सॉफ्टवेअर फीचरचे व्यापक रोलआउट जगभरात आधीच सुरू झाले आहे आणि आता हे अपडेट One UI 5 वर चालणाऱ्या Galaxy S22 स्मार्टफोनवर देखील रोल आउट केले जाईल. त्यानंतर ते हळूहळू इतर उपकरणांसाठी आणले जाणार आहे.
तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनवर मेंटेनन्स मोड ऍक्टिव्ह करण्यासाठी,
> प्रथम तुम्हाला सेटिंग्जवर जावे लागेल.
> यानंतर, Battery and device care च्या पर्यायातून Maintenance Mode ऑन करावा लागेल.
> आता तुम्ही फोन रीबूट करून सर्व्हिस सेंटरला देऊ शकता.