काही दिवसांपूर्वी सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन नोट 7 लंडनमध्ये लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनला भारतात लाँच केले गेले आहे. ह्या स्मार्टफोनचे डिझाईन काही गॅलेक्सी S7 एज सारखेचा आहे. ह्यात एक ड्यूल एज डिस्प्ले मिळत आहे. तथापि ह्याचा कर्व्ह्ड डिस्प्ले S7 एज पेक्षा थोडा वेगळा आहे. ह्यासोबतच हा IP68 ने प्रमाणित आहे. ह्याची किंमत आहे ५९,९९० रुपये आणि ा १९ ऑगस्ट २०१६ पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकला जाईल.
ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या व्हर्जनमध्ये एक्सीनोस 8890 प्रोसेसर आहे. ह्यात आपल्याला 4GB रॅम मिळत आहे, तसेच ह्यात आपल्याला 64GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 12MP चा ड्यूल कॅमेरा मिळत आहे.त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची FHD डिस्प्ले मिळत आहे.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
गॅलेक्सी नोट 7 सह सॅमसंगने आपला गियर VR हेडसेटसुद्धा लाँच केलाय हा आपल्याला काळ्या रंगात मिळेल. त्याशिवाय ह्यात आपल्याला एक USB टाईप C पोर्टसुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला एक वेगळा मायक्रो-युएसबी अॅडाप्टरसुद्धा मिळेल.
हेदेखील वाचा – १६ ऑगस्टला लाँच होणार Le Eco-coolpad कूल 1 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – एअरटेल देणार 15GB पर्यंत मोफत ब्रॉडबँड डाटा