मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच केला आहे. हा एक स्वस्त बजेट स्मार्टफोन आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सॅमसंग गॅलेक्सी J3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर ह्यात 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश आणि ऑटोफोकसवाला 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2,600mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनची जाडी 7.9mm आहे.
सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र आशा आहे की, हा स्मार्टफोन $120 मध्ये मिळू शकतो.