Samsung ने लाँच केला एंट्री लेव्हल स्मार्टफोन, योग्य दरात मिळतील जबरदस्त फीचर्स

Updated on 27-May-2022
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन लाँच.

6.6-इंच लांबीचा Infinity-V फुल HD प्लस डिस्प्ले.

फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसरसोबत 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.

सध्या बऱ्याच स्मार्टफोन निर्माता कंपन्या कमी किमतीत ग्राहकांना परवडेल असे दमदार स्मार्टफोन्स बाजारात आणत आहेत. या यादीमध्ये आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.  Samsung ने आपला एंट्री लेव्हल फोन Samsung Galaxy M13 लाँच केला आहे. Samsung Galaxy M13 कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, या उपकरणाची किंमत आणि उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Samsung Galaxy M13 सह Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. Galaxy M13 मध्ये 5000mAh बॅटरी 15W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy M13 मध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनबाबत सविस्तर माहिती…

Samsung Galaxy M13 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M13 मध्ये 6.6-इंच लांबीचा Infinity V फुल HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय,  या सॅमसंग फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसरसोबत 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये Android 12 सह One UI 4.1 देण्यात आला आहे.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M13 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे, ज्याचे अपर्चर f.18 आहे. दुसरी लेन्स 5-मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी सॅमसंगने 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
 याव्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 4G LTE, Dual Band Wi-Fi (2.5Ghz/5GHz), Bluetooth v5.0 देखील आहे. त्याबरोबरच, यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Samsung Galaxy M12 गेल्या वर्षी मार्चमध्ये 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.

Samsung Galaxy M12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M12 मध्ये Exynos 850 प्रोसेसर आहे. हा फोन 6.5-इंच लांबीच्या Infinity-V डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  हा फोन इनबिल्ट Li-Ion 6000 mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. Samsung Galaxy M12 ची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. या किंमतीत 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज उपलब्ध असेल.  Samsung Galaxy M12 सर्व आघाडीच्या ऑफलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :